Pune News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील १ लाख २४ हजार ९३७ महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते. .विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेची सुरुवात करण्यात आली तेव्हा तिच्या अर्ज पडताळणीकडे सरकारकडून कमी लक्ष देण्यात आले. परंतू, सरकारच्या तिजोरीवर या योजनेमुळे आर्थिक भार निर्माण होत असल्यामुळे सरकारने कठोर पावले उचलत छाननी प्रक्रियेला सुरुवात केली आहे..Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींनी लाटले ५१०० कोटी रुपये; सरकार कारवाई करणार.या छानणी प्रक्रियेत, सरकारने मराठवाड्यातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घराघरांत जाऊन पडताळणीची मोहीम राबवली. यात अनेक अपात्र महिलांनी खोटी कागदपत्रांचा आधार घेऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समजले. यात काही महिलांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्याचे आढळले, तर काहींचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असूनदेखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. तर काही घरांमध्ये नियम मोडून दोन महिलांना पात्रता असताना दोनऐवजी तीन महिलांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे..Ladki Bahin Yojana : विभक्त रेशनकार्डधारक सुना ‘लाडकी बहीण’साठी पात्र.सरकारकडून ही तपासणी दोन टप्प्यांत पार पडली. पहिल्या टप्प्यात २१ वर्षांखालील आणि ६५ वर्षांपलीकडील महिलांचे अर्ज तपासले गेले. तेव्हा या फेरीत एकूण १ लाख ३३ हजार अर्जांपैकी केवळ ४० हजार २२८ अर्ज अपात्र ठरले आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात एका घरात दोनपेक्षा जास्त महिलांनी घेतलेल्या लाभांची छाननी करण्यात आली. यात ४ लाख ९ हजार ७२ अर्जांची तपासणी झाली असून ८४ हजार ९०७ अर्ज अपात्र आढळले आहेत..याबाबतची माहिती जिल्हा व महिला बालविकास अधिकाऱ्यांनी दिली असून त्यांनी सांगितले की, योजनेतील सर्वेक्षण जिल्हास्तरावर पार पडले आहे. याबाबतची आकडेवारी शासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही टप्प्यांच्या छाननीनंतर तब्बल १ लाख २४ हजार ९३७ महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.