Labor Management : रोपवाटिकेतील मजूर व्यवस्थापन

Nursery Business : कोणत्याही उद्योग धंद्याप्रमाणे रोपवाटिका हा सुद्धा एक व्यवसाय समजला जातो. तसेच रोपवाटिकेत वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करण्यासाठी मजुरांची गरज भासते.
Nursery
NurseryAgrowon

Nursery Labor Management : कोणत्याही उद्योग धंद्याप्रमाणे रोपवाटिका हा सुद्धा एक व्यवसाय समजला जातो. तसेच रोपवाटिकेत वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करण्यासाठी मजुरांची गरज भासते. हे मजूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात व त्यासाठी मजुरीचे वेगवेगळे दरही असतात.

रोपवाटिकेत मजुरांची गरज कमी जास्त असते, तसेच त्यांच्या काही अडचणीही असतात. त्यामुळे मजूर व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे. मजुरीवरील खर्च २५ टक्के, तर व्यवस्थापनाचा खर्च ३० टक्क्यांच्या आत असावा.

Nursery
Rural Development : गाव स्वच्छतेसाठी मजूर भरण्यास मान्यता नाही

मजूर व्यवस्थापनात महत्त्वाच्या बाबी

- गरजेप्रमाणे मजूर ठेवावेत. कमी मजुरांकडून अधिक काम करवून घेणे, अधिक मजुरांकडून कमी काम करून घेणे टाळावे.

- बालमजूर, नेहमी आजारी पडणारे मजूर, व्यसनी मजूर, हट्टी मजूर, भांडखोर, चुगलखोर, भुरटे, अनियमित वागणारे अशांना मजूर म्हणून कामावर ठेवणे टाळावे.

- मजुरी वेळेवर व नियमितपणे द्यावी. त्यांना अडचणीत आर्थिक मदत करावी.

- प्रामाणिक मजुरांना जादा केलेल्या कामाचा वेगळा मोबदला द्यावा.

- मजुरांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा.

- रोपवाटिकेतील कामे सुलभ होण्यासाठी काही सुविधा द्याव्यात. उदाहरणार्थ - सावली, पिण्याचे पाणी, मधली सुट्टी, विश्रांती इत्यादी.

- एखाद्या कामात मध्येच बदल करू नये. तसेच एकाच कामावरील मजूरही वारंवार बदलू नयेत.

- मजुरांचाही काही बाबतीत सल्ला घ्यावा. त्यांना विश्‍वासात घ्यावे. इतर बाबींमुळे होणारे नुकसान मजुरांवर ढकलू नये. मजुरांना मार्गदर्शन करावे, त्यांची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न करावेत. मजूरविषयक कायद्याचे पालनही करावे.

संपर्क - प्रा. प्रवीण सरवळे, डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com