Cotton Picking : कापूस वेचणीला मजूर मिळेना

Labour Shortage : यंदाही मोठ्या प्रमाणावर लागवडी आहेत. मात्र, पावसामुळे नुकसान होऊन उत्पादन घटल्याची स्थिती आहे.
Cotton Picking
Cotton Picking Agrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील पूर्व भागात प्रामुख्याने मालेगाव, नांदगाव व येवला तालुक्यातील शेतकरी कापूस लागवडी करतात. यंदाही मोठ्या प्रमाणावर लागवडी आहेत. मात्र, पावसामुळे नुकसान होऊन उत्पादन घटल्याची स्थिती आहे.

एकीकडे उत्पादनात फटका तर दुसरीकडे कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पूर्व भागात प्रामुख्याने मालेगाव तालुक्यातील माळमाथ्यावरील झोडगे, भिलकोट, पळासदरे, साजवहाळ, पाडळदे, शेरूळ, हिसवाळ, शेंदुर्णी, रोझांणे, खलाणे, कळवाडी, दहिवाळ, देवघट, चिंचगव्हाण आदी गावांमध्ये ही परिस्थिती आहे.

अनेक ठिकाणी पहिली वेचणी झालेली नाही. तर काही ठिकाणी दुसरी वेचणी सुरू असताना मजूर मिळत नसल्याने कापूस झाडावर लोंबत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मजुरांची उपलब्धता होण्यासाठी शेतकरी दैनंदिन रोजंदारीपेक्षा जास्तीचे पैसे देऊ करत असतानाही मजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Cotton Picking
Cotton Picking Bags : कापूस वेचणी बॅग पुरवठ्यात ‘स्मार्ट’ चलाखी

त्यामुळे हंगामी कामे आटोपून घेण्यासाठी घरच्या सदस्यांच्या मदतीने कापूस वेचणी करत आहेत. मात्र तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने कामकाज वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शेतकरी स्थानिक मजूरांकडे कामांसाठी चौकशी करत आहेत; मात्र ते उपलब्ध होत नसल्याने बाहेरगावावरून वाहनाद्वारे मजुरांना कापूस वेचणीसाठी आणण्याची वेळ आली आहे.

Cotton Picking
Cotton Picking : कापूस वेचणीची मजुरी परवडेना

शेतकऱ्यांची चहूबाजूने कोंडी

मागील वर्षी २०० रुपये होती. तर यंदा ३०० रुपयांचे रोजंदारी होती. काही ठिकाणी ६ रुपये किलोप्रमाणे वेचणी केली जायची. हेच दर आता १० ते १२ किलोप्रमाणे मजूर सांगत आहेत.परिणामी शेतकऱ्यांची चहूबाजूने कोंडी होत आहे.

कापूस वेचणीसाठी मजुरांना बोलावूनही मजूर वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे कापूस हंगाम अडचणीचा ठरत आहे. पहिल्या वेचणीचा कापूस ही लागवडीत तसाच आहे. यंदा शेतकऱ्यांसाठी हे वर्ष खूपच अडचणीचे आहे. -रामकृष्ण जाधव, कापूस उत्पादक शेतकरी, पाडळदे, ता. मालेगाव.
आधीच उत्पादन घटले असून मजुरांमुळे होणारी ओढाताण पाहता बाहेरच्या राज्यातील मजुरांना कापूस वेचणीसाठी आणावे लागते. हा खर्च खूप महागडा असून परवडणारा नाही.
-दिलीप शिंदे, कापूस उत्पादक शेतकरी, शेंदुर्णी, ता. मालेगांव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com