Water Allocation Issue: उपसाबंदीविरोधात इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर गुरुवारी (ता. १८) सायंकाळपर्यंतही तोडगा निघू शकला नाही. पाटबंधारे विभागाकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय इरिगेशन फेडरेशनने घेतला..गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी उपसाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत. इरिगेशन फेडरेशनसह विविध शेतकरी संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे..Farmers Protest: कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन.शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता उपसाबंदी लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. .Rahuri Farmers Protest: कांदादर, संपूर्ण कर्जमाफीसाठी राहुरीत ‘रास्ता रोको’.गुरुवारी दिवसभर आंदोलकांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र, विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही..यामुळे उपसाबंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.