Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर, सांगली पुराचा मराठवाड्याला फायदा, कसा असेल प्रकल्प? जागतिक बँक, अर्थ मंत्रालयाची मंजुरी

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.
Kolhapur Sangli Flood
Kolhapur Sangli Floodagrowon

Kolhapur Sangli Flood Management Project : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

जागतिक बँकेच्या चमूने १२ सप्टेंबर २०१९ रोजी कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर लगेचच फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. त्याच सुमारास हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते. या प्रकल्पात जागतिक बँक २८० मिलियन डॉलर्स (सुमारे २३२८ कोटी रुपये), तर राज्य सरकार सुमारे १२० मिलियन डॉलर्ससुमारे ९९८ कोटी रुपये) असे योगदान देणार आहे. एकूण ३३०० कोटींचा (४०० मिलियन डॉलर्स) हा प्रकल्प असणार आहे.

महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ, तर दुसरीकडे महापूर अशी परिस्थिती निर्माण होते. हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे. अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठीशी असतो. अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाचवेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मांडली होती.

त्यातून महाराष्ट्र वातावरणपूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामे करणे शक्य होणार आहे. पूररेषा आखणे, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत. नीती आयोगानेसुद्धा याबाबत पूरक अहवाल दिला होता.

Kolhapur Sangli Flood
Crop Insurance Scheme Kolhapur : प्रधानमंत्र्यांची पीक विमा योजना म्हणजे 'नुकसान परवडलं; पण नियम नकोत'

कशी घडली प्रक्रिया

महापुरानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योजनेचे सूतोवाच

जागतिक बँकेच्या पथकाकडून प्रत्यक्ष पूरस्थितीची पाहणी

त्यानंतर प्रकल्पाला अर्थसहाय्यचा निर्णय

नीती आयोगाकडून प्रकल्पास हिरवा कंदील

दृष्टिक्षेपात प्रकल्प खर्च (आकडे कोटी रुपयांत)

प्रकल्पाचा अंदाजित खर्च - ३३००

जागतिक बँकेचे अर्थसहाय्य - २३२८

राज्य सरकारचे योगदान - ९९८

  • अतिरिक्त पाणी ८८ दुष्काळी भागात वळवणे शक्य आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला लाभ होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com