किसनवीर कारखान्यात १९ वर्षांनंतर सत्तांतर

आमदार मकरंद पाटील गटाची एकहाती सत्ता
kisanveer Sugar Factory
kisanveer Sugar Factory Agrowon
Published on
Updated on

वाई, जि. सातारा : भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत १९ वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसनवीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व २१ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ शेतकरी विकास पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.

कारखान्याच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी कार्यक्षेत्रातील वाई, खंडाळा, जावळी, कोरेगाव, सातारा व महाबळेश्वर या सहा तालुक्यांतील एकूण १५४ मतदान केंद्रांवर मंगळवारी (ता. ३) ६९.३१ टक्के मतदान झाले. या वेळी ५१ हजार ११६ ऊस उत्पादक सभासदांपैकी ३५ हजार ५७१, तर संस्था सभासद ३७४ पैकी ३३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

निवडणुकीत चार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. वाई औद्योगिक वसाहतीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता.५) सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता सोसायटी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. किसनवीर बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार ८ ते ९ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते :

  • रामदास संपतराव गाढवे, खंडाळा (२२,१५५), नितीन लक्ष्मणराव जाधव-पाटील, बोपेगाव (२२,२४४), किरण राजाराम काळोखे, खानापूर (२१,७१६), प्रकाश लक्ष्मण धुरगुडे, भिरडाचीवाडी (२१,६७९), रामदास महादेव इथापे, शिरगाव (२१,५६८), प्रमोद भानुदास शिंदे, जांब (२१,५०७), दिलीप आनंदराव पिसाळ, बावधन (२२,३५९), शशिकांत मदनराव पिसाळ, बावधन (२२,०५८), हिंदुराव आनंदराव तरडे, बामणोली तर्फ कुडाळ (२१,४६९), संदीप प्रल्हाद चव्हाण (२२,११०), सचिन हंबीरराव जाधव (२२,०३६) बाबासाहेब शिवाजी कदम (२१,८३३), ललित जोतिराम मुळीक (२१,५६७), संजय अरविंद फाळके (२१,६७३), सचिन घनश्याम साळुंखे (२१,५३२), सुशीला भगवानराव जाधव (२२,३९४), सरला श्रीकांत वीर (२१,५६२), मकरंद लक्ष्मणराव जाधव- पाटील (२३८), संजय निवृत्ती कांबळे (२२,७२४),हणमंत बाबासाहेब चवरे (२२,६६१),शिवाजी बंडू जमदाडे (२२,६१०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com