Hirda
Hirda Agrowon

Kisan Sabha March : हिरडा, दूधदरप्रश्‍नी अकोल्यात किसान सभेचा मोर्चा

Hirda and Milk Rate Issue : अकोले तालुक्यात हिरड्याची खरेदी करावी, दुधाला किमान ३४ रुपये हमी दर द्यावा, राहत्या घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करावीत यासह अन्य मागण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) अकोले (जि. नगर) येथे किसान सभेतर्फे डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
Published on

Nagar News : अकोले तालुक्यात हिरड्याची खरेदी करावी, दुधाला किमान ३४ रुपये हमी दर द्यावा, राहत्या घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करावीत यासह अन्य मागण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) अकोले (जि. नगर) येथे किसान सभेतर्फे डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या वेळी दूध ओतून सरकारचा निषेध केला.

अकोले तालुक्यात हिरड्याची सरकारी खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, यासाठी आवश्यक आलेल्या १०६ पेसा गावांचे ठराव करण्यात आले आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, दुधाला सध्या अत्यंत कमी दर मिळत आहे.

Hirda
Kisan Sabha Protest : किसान सभेचा आक्रोश मोर्चा

त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, दूध संघ चालकांकडून मनमानी करत सामूहिक लूट करत आहेत. शेतकऱ्यांची दूध दराबाबत होणारी पिळवणूक थांबावी, दुधाला किमान ३४ रुपये दर मिळावा,

Hirda
Hirda Compensation : हिरडा नुकसान भरपाईसाठी किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

राहत्या घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी केलेली प्रकरणे तपासावीत यासाठी तहसील कार्यालयावर किसान सभेचे सरचिटणीस डॉ. नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाला मागण्याचे निवेदन दिल्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

आंदोलनात सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभिरे, भीमा मुठे, शिवराम लहामटे, तुळशीराम कातोरे, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com