Loan Waiver : तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी द्यावी; किसान सभेची मागणी

Kisan Sabha's demand for loan waiver : तेलंगणा काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी (ता.२२) कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी अशी मागणी होत आहे.
Loan Waiver
Loan WaiverAgrowon
Published on
Updated on

Pune News : तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी (ता.२२) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कृषी कर्ज माफीची घोषणा केली. तर १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे २ लाख पर्यंतचे कर्ज सरकार माफ करेल असे स्पष्ट केले. त्यानंतर आता राज्यात देखील कर्जमाफी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. नवले यांनी, तेलंगणाप्रमाणेच राज्यातील महायुती सरकारने कर्जमाफी द्यावी, असे वक्तव्य केलं आहे.

यावेळी नवले म्हणाले, याआधी देखील महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना दोन वेळा कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र ती कर्जमाफी अटी व शर्तींच्या बंधनात होती. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले होते. नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिल्याचे नवले म्हणाले.

Loan Waiver
Loan Waiver : शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्या

तर राज्यात सत्ता पालटानंतर महायुती सरकारने कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. त्याचाच फटका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. त्यामुळे राज्य सरकारने आता तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांचा विचार करावा. राज्य सरकारने करमाफी करावी. तर कर्जमाफी करताना अटी शर्तींच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी नवले यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकार देखील शेतकरी कर्जमाफी करणार अशी चर्चा होत आहे. त्यामुळे मागील कर्जमाफीचा घोळ सरकारने लक्षात घ्यावा. पात्र शेतकऱ्यांसह नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी देखील नवले यांनी केली आहे.

Loan Waiver
Farmer Loan Waiver : नियमित कर्ज परतफेड केली ती चूक झाली का? सत्तानाट्यात शेतकरी वाऱ्यावर

कागदी घोडे नाचवण्यापेक्षा...

राज्य सरकारने फक्त कर्जमाफीची घोषणा करून कागदी घोडे नाचवण्यापेक्षा कर्जमाफीची अंमलबजावणी करावी. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आपल्या राज्यात होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याबरोबरच कर्जमाफीची योजना राज्य सरकारने राबवावी, असेही आवाहन सरकारला नवले यांनी केले आहे.

४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

तेलंगणामधील काँग्रेस सरकारने शेतकरी हिताचा विचार करत ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. तर मुख्यमंत्री रेड्डी यांच्या मंत्रिमंडळाने ३१ हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला शनिवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री रेड्डी यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात प्रमाणे काम केलं. आता राज्य सरकारने देखील तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, असेही अजित नवले यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com