Farmer Subsidy Demand: नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्या; किसान सभेची कृषिमंत्री भरणे यांच्याकडे मागणी
Farmer Support: राज्य सरकारने कर्जमाफीवरील जाचक अटी शिथिल केल्या असल्या, तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. २१) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.