Agriculture Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे कर्ज मंजुरी, परतफेडीचे वेळापत्रक आणि पीक हंगामाच्या व्याख्येत एकसमानता आणून शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि वेळेत कर्जपुरवठा करण्याचा उद्देश आहे. नवीन नियम जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत..आरबीआयने म्हटले आहे, की शेती व संलग्न क्षेत्रांतील कर्जदारांच्या खेळत्या भांडवलाच्या तसेच गुंतवणूक कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केसीसी योजनेची कार्यपद्धती अधिक सुलभ आणि मानकीकृत करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांकडून कर्ज वितरण आणि परतफेड प्रक्रियेत स्पष्टता येणार आहे..Farmer Loan Issue: ‘किसान क्रेडिट कार्ड’ असूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळविणे अवघड: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान.पीक हंगामाच्या व्याख्येचे मानकीकरण. उत्पन्नाची नोंद आणि मालमत्ता वर्गीकरण नियमांशी सुसंगतता राखण्यासाठी कमी कालावधीच्या पिकांसाठी पीक हंगामाचा कालावधी १२ महिने, तर दीर्घ कालावधीच्या पिकांसाठी १८ महिने निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासून कापणी आणि बाजारातील विक्रीपर्यंतचा कालावधी म्हणजे पीक हंगाम मानला जातो..KCC New Rules: किसान क्रेडिट कार्ड नियमांत बदल, शेतकऱ्यांना काय होईल फायदा?.आरबीआयने यासंदर्भातील मसुदा फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध केला होता. विविध घटकांकडून प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम निर्देश जारी करण्यात आले. मात्र, तारणाविना कर्जाची कमाल मर्यादा वाढविण्याची मागणी आरबीआयने मान्य केलेली नाही. डिसेंबर २०२४ मध्ये ही मर्यादा वाढविण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे..शेतकऱ्यांना काय होणार फायदा?कर्ज मंजुरी आणि परतफेडीच्या प्रक्रियेत अधिक स्पष्टता.पीक हंगामाची एकसमान व्याख्या असल्याने कर्ज वर्गीकरणातील गोंधळ कमी होणार.वेळेत कर्ज उपलब्ध होण्यास मदत.दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तारण सवलत कायम.खेळते भांडवल आणि गुंतवणूक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.