अरविंद मोटे Solapur News: देशभर सुरू असलेल्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या पार्श्वभूमीवर १९ ते २४ जानेवारीदरम्यान पार पडलेले पदचिन्ह सर्व्हेक्षण तांत्रिक कारणांमुळे सदोष ठरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ ठिकाणच्या वनक्षेत्रामध्ये सोमवार (ता. १६) पासून पुन्हा सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले असून, त्यानंतर ट्रॅपकॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अजित शिंदे यांनी दिली..देशभर १९ जानेवारीपासून व्याघ्रगणना सुरू झाली. १६ फेब्रुवारीपासून ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे ही मोजणी होणार होती. मात्र, पहिल्या टप्यातील १९ ते २४ जानेवारी या काळात झालेले पदचिन्ह सर्वेक्षण सदोष आढळल्याने हाच सर्व्हे पुन्हा करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यामुळे ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे होणारी मोजणी पुढे गेली असून, १६ ते २२ फेब्रुवारी या काळात पुन्हा पदचिन्हांचे सर्व्हेक्षण होणार आहे..Tiger Census: सोलापुर जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून होणार ‘व्याघ्र गणना’.ॲपमध्ये नोंद करणे बंधनकारकवनकर्मचाऱ्यांना वनक्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन पाणवठे तसेच वन्यप्राण्यांच्या अधिवासाची शक्यता असलेल्या ठिकाणी पाहणी करावी लागणार आहे. या वेळी आढळलेले प्राण्यांचे पावलांचे ठसे, विष्ठा, तसेच वन्यप्राण्यांनी केलेल्या शिकारीचे अवशेष यांची नोंद करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती वन विभागाने विकसित केलेल्या विशेष ॲपमध्ये भरणे बंधनकारक करण्यात आले आहे..Chandrapur Tigers: चंद्रपूर होणार ‘वाघांची राजधानी.ट्रॅप कॅमेऱ्यांतून अचूक संख्याएका ठिकाणी दोन कॅमेरे बसविले जाणार असून, त्यातून कॅमेऱ्याच्या टप्प्यात येणाऱ्या प्राण्यांचे दोन्ही बाजूंनी छायाचित्र टिपले जाणार आहे. जिल्ह्यातील वन्यप्राण्यांची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे. विशेषतः बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचा वावर आणि संख्या याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे..येडशी परिसरातील वाघाचा लागणार मागोवामागील दीड ते दोन वर्षांपासून बार्शी-येडशी परिसरात वावरणाऱ्या वाघाचा सध्याचा ठावठिकाणा या व्याघ्रगणनेतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. Yedshi Ramling Wildlife Sanctuary परिसरात अधूनमधून दिसणारा हा वाघ गेल्या दोन महिन्यांपासून आढळलेला नाही. अभयारण्यात पुरेसे खाद्य व पाण्याची उपलब्धता असल्याने तो अद्याप त्याच परिसरात असावा, असा वनअधिकाऱ्यांचा अंदाज आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये त्याची नोंद झाल्यास त्याचा सध्याचा वावर निश्चितपणे समोर येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.