Loan Waiver : केंद्रीय मंत्री खट्टर आणि शेतकरी नेत्यांची ३ तास बैठक; व्यापार करार, हमीभावाचा कायदा, कर्जमाफी, बियाणे विधायकावर चर्चा, शेतकरी नेत्यांच्या १० मागण्या
Khattar-Farmer Leaders Meet : शेतकरी नेत्यांनी हमीभावाची कायदेशीर हमी, भारत-अमेरिका व्यापार करारामधून कृषी क्षेत्राला वगळणे आणि शेतातून जाणाऱ्या उच्च दाब वीजवाहिन्यांसाठी योग्य मोबदला यांसह १० प्रमुख मागण्या सरकारसमोर मांडल्या. तसेच या मागण्यांसंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सरकारला देण्यात आले.