Kharif Crops : पुसद तालुक्‍यात ७५ हजार ५०० हेक्‍टरवर खरीप पिके

Kharif Season : यंदाच्या हंगामात पुसद तालुक्‍यात सुमारे ७५ हजार ५०० हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड होणार आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड क्षेत्र हे सोयाबीनचे असून त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रिया व इतर बाबींविषयक जागृतीवर भर देण्यात आला आहे.
Kharif Crop
Kharif CropAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : यंदाच्या हंगामात पुसद तालुक्‍यात सुमारे ७५ हजार ५०० हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड होणार आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड क्षेत्र हे सोयाबीनचे असून त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रिया व इतर बाबींविषयक जागृतीवर भर देण्यात आला आहे.

पुसद तालुक्‍यात यंदा ७५ हजार ५०० हेक्‍टरवर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ३४ हजार ४५० हेक्‍टरवर सोयाबीन राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पीक कपाशी असून, याचे लागवड क्षेत्र २५ हजार ५०० हेक्‍टर अपेक्षित आहे. त्यासह तूर ११ हजार १५०, ज्वारी ६००, मूग २६०, तर उडीद पिकाचे क्षेत्र २५० हेक्‍टर राहील, असे तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी सांगितले.

Kharif Crop
Kharif Season : खरीपपूर्व शेती कामांना सुरूवात

तालुक्‍यातील १८ हजार १० हेक्‍टर जमीन भारी पोत असलेली आहे. २३ हजार २०९ हेक्‍टर मध्यम, तर ३३ हजार ८३१ हेक्‍टर जमीन हलकी आहे. हलक्‍या जमिनीत कपाशी, उडीद व मूग या पिकांच्या लागवडीवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुसद तालुक्‍यात शेतकरी कुटुंबांची संख्या ३१ हजार ७६८ आहे. यामध्ये अल्पभूधारक १६ हजार २२९, अत्यल्प भूधारक ९ हजार ६९० तर बहूधारक १३ हजार ८४९ आहे.

Kharif Crop
Kharif Sowing : सांगोल्यात खरिपाची ३७ हजार ९७५ हेक्टरवर पेरणी अपेक्षित

तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे ४ हजार ६२३ क्‍विंटल सोयाबीन उपलब्ध असून ३० हजार बॅग सोयाबीन पेरणीसाठी लागेल. कापूस लागवडीसाठी एक लाख १० हजार ५०० बियाणे पाकिटांची आवश्‍यकता आहे. तालुक्‍यात २१ हजार ५४१ पोती खते लागणार असून यामध्ये युरिया ५ हजार ५८७, डीएपी २ हजार ११६, एमओपी ४२३, एसएसपी ४ हजार २३३ याप्रमाणे खतांची मागणी आहे.

शेतकऱ्यांनी लागवडीपूर्वी बियाण्याची उगवणशक्‍ती तपासावी. त्यासह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीजप्रक्रियेवर भर द्यावा. त्याकरिता जिल्हास्तरावर जागृती केली जात आहे.
विजय मुकाडे, तालुका कृषी अधिकारी, पुसद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com