
Parbhani Sowing News : यंदाच्या (२०२३-२४) खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात ५ लाख ११ हजार ६९० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात १९ हजार ८०० हेक्टरने घट तर कपाशीच्या क्षेत्रात १५ हजार ५५२ हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे.
ज्वारी, बाजरी आदी तृणधान्ये, तूर, मूग, उडीद आदी कडधान्ये पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
परभणी जिल्ह्यात २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांतील खरिपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ३० हजार ७८४ हेक्टर होते. ऊस, हळद या पिकांचे लागवड क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या क्षेत्रात घट होत आहे.
गतवर्षी (२०२२) खरिपाची एकूण ५ लाख १० हजार ७३८ हेक्टरवर पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन वगळता अन्य पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात ज्वारीच्या क्षेत्रात १ हजार ९४५ हेक्टरने, बाजरीच्या क्षेत्रात २७७ हेक्टरने तर मक्याच्या क्षेत्रात ८८ हेक्टरने वाढ प्रस्तावित आहे.
तुरीच्या क्षेत्रात १ हजार ९७१ हेक्टरने, मुगाच्या क्षेत्रात ६५९ हेक्टर, उडदाच्या क्षेत्रात २३३ हेक्टरने वाढीची शक्यता आहे. यंदा तृणधान्यांच्या क्षेत्रात २ हजार ३११ हेक्टरने तर कडधान्यांच्या क्षेत्रात २ हजार ८६८ हेक्टरने वाढ प्रस्तावित आहे. गतवर्षी सोयाबीनची २ लाख ६९ हजार ८०० हेक्टरवर पेरणी झाली होती.
यंदा त्यात १९ हजार ८०० हेक्टरने घट होऊन २ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. कपाशीची १ लाख ७९ हजार ४४७ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा त्यात १५ हजार ५५२ हेक्टरने वाढ होऊन १ लाख ९५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित आहे.
परभणी जिल्हा खरीप पेरणी तुलनात्मक स्थिती (हेक्टरमध्ये)
पीक - २०२२ पेरणी क्षेत्र - २०२३ प्रस्तावित क्षेत्र
सोयाबीन - २६९८०० - २५००००
कपाशी- १७९४४७- १९५०००
तूर - ३९४८८ - ४५६०६
मूग - १३१७१ - १३८३०
उडिद - ४६१६- ४८५०
ज्वारी- २६५४- ४६००
बाजरी - २२३ - ५००
मका - ९९९- १०००
तीळ - २३८ - २५०
कारळ - ४५- ५०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.