Indian Agriculture: जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार जोर दाखविलेल्या मॉन्सूनमुळे देशातील खरीप पेरणीला वेग आला असला तरी, १० जुलैअखेर पेरणीतील तूट अद्यापही १६ टक्क्यांच्या आसपास आहे. जूनअखेरीस ही तूट २१ टक्के होती. मात्र, पेरणीचे क्षेत्र अद्यापही गतवर्षीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असल्याने खरीप उत्पादनाबाबतची चिंता कायम आहे. त्यातच पुढील सहा ते सात दिवस मॉन्सून फारसा सक्रिय राहणार नसल्याचा भारतीय हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज असल्याने पुढ्यात वाढून ठेवलेल्या परिस्थितीकडे शेती क्षेत्राचे लक्ष लागले आहे. .देशात १० जुलैअखेर खरीप पिकांची पेरणी ५.३१ कोटी हेक्टरवर झाली असून, ती गतवर्षी ६.३३ कोटी हेक्टर होती.भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम भारत, पश्चिम-मध्य भारत आणि दक्षिण भारतात पुढील सहा ते सात दिवस पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकतीच वेग घेतलेली खरीप पेरणी पुन्हा मंदावण्याची शक्यता व्यक्त होत आहे..भाताची स्थिती दिलासादायककेंद्रीय कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १० जुलैअखेर भाताची पेरणी सुमारे १.१५ कोटी हेक्टरवर झाली असून, ती गतवर्षीच्या तुलनेत ८.७ टक्क्यांनी कमी आहे. जुलैच्या सुरुवातीच्या पावसानंतर भात लागवडीत सुधारणा झाली असून, अंतिम उत्पादनावर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती १.२६ कोटी हेक्टर होती..Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती.भाताच्या तुलनेत डाळी, तेलबिया आणि कापसासारख्या महत्त्वाच्या पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. या पिकांच्या पेरणीत लक्षणीय तूट असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र डाळी आणि तेलबियांच्या पेरणीतील घट सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. देशांतर्गत मागणी भागविण्यासाठी या पिकांच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत असल्याने पेरणीतील तूट भविष्यात पुरवठ्यावर परिणाम करू शकते. डाळींची पेरणी ५६.६३ लाख हेक्टरवर झाली असून, ती गतवर्षीच्या ७३.८५ लाख हेक्टरच्या तुलनेत २३.३ टक्के कमी आहे. तेलबियांचे क्षेत्र १.४९ कोटी हेक्टरवरून १.१८ कोटी हेक्टरवर आले आहे..भरड धान्यांची पेरणीही २१ टक्क्यांनी घटून ९८.६९ लाख हेक्टरवर आली आहे. कापसाची लागवड ७९.५४ लाख हेक्टरवर झाली असून ती १५.३ टक्क्यांनी कमी आहे. सोयाबीनची पेरणी १०७.७२ लाख हेक्टरवरून ९०.५१ लाख हेक्टरवर, तर भुईमुगाची लागवड ३५.४५ लाख हेक्टरवरून २३.४० लाख हेक्टरवर घसरली आहे..Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’.डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीची पेरणी ३० टक्क्यांनी घटून १९.५४ लाख हेक्टरवर झाली आहे. मूग २१.५२ लाख हेक्टर, तर उडीद ९.३४ लाख हेक्टरवर पेरला गेला असून या दोन्ही पिकांमध्येही लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. दुसरीकडे, ऊस लागवड गतवर्षीपेक्षा किंचित वाढून ५७.५८ लाख हेक्टरवर पोहोचली असून ज्यूट आणि मेस्टा पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे..दरम्यान, केंद्र सरकारने चालू खरीप हंगामासाठी १७६.१६ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यात १२३.१५ दशलक्ष टन तांदूळ, ८.४ दशलक्ष टन कडधान्ये, ३१.०४ दशलक्ष टन मका आणि १३.५६ दशलक्ष टन भरड धान्यांचा समावेश आहे. तेलबिया उत्पादनाचे लक्ष्य २८.९२ दशलक्ष टन ठेवण्यात आले आहे..जलसाठ्यात सुधारणामॉन्सून सक्रिय झाल्याने देशातील १६६ प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात सुधारणा झाली आहे. ९ जुलैअखेर धरणांतील एकूण उपयुक्त साठा क्षमतेच्या ३२.३८ टक्के झाला असून, आठवडाभरापूर्वी तो २६ टक्के होता. पश्चिम भारतातील ५३ धरणांमधील साठा दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा ४८ टक्के अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे..डाळी, तेलबिया, कापूस मागेपिके लागवडीखालील क्षेत्र (आकडे हेक्टरमध्ये) घट(आकडे टक्क्यांत)डाळी ५६.६ लाख २३.३भरड धान्ये ९८.६ लाख २२.५तेलबिया १.१८ कोटी २१कापूस ७९.५ लाख १५.३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.