Agriculture Water Supply Project: आंबोली धरण लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत खारआंबोली उजवा व डावा तीर कालव्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती मिळाली आहे. मार्च २०२५ पासून पाटबंधारे विभागाने प्राधान्याने काम हाती घेतले असून, शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास मे २०२६ अखेर कालव्याचे काम पूर्ण होईल, अशी खात्री अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे..१० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. .Kukadi Irrigation Development: कुकडी डावा कालव्याच्या नूतनीकरणासाठी ४७ कोटी.कालवा पूर्ण झाल्यास सुमारे ६०० हेक्टर जमीन दुबार पिकाखाली येणार असून, उन्हाळी भातशेतीसह भाजीपाला, कडधान्ये, फळपिके घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे..Kalmodi Irrigation Project: ‘कळमोडी प्रकल्पा’च्या पाणी वापराचे फेरनियोजन.सध्या उजवा तीर कालवा सुमारे पाच कि.मी., तर डावा तीर कालवा दोन कि.मी. पूर्ण झाला आहे. आंबोली धरणामुळे मुरूड शहरासह १२ गावांना पिण्याचे पाणी मिळत असले तरी कालव्याअभावी शेतीला पाणी मिळत नव्हते. रब्बी हंगामात पाण्याअभावी शेतकरी उन्हाळी भात घेऊ शकत नव्हते..दरम्यान, ‘ओपन पाइप डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क’ या नव्या धोरणानुसार बंदिस्त पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, यामुळे पाण्याचा थेट पुरवठा होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.