Summer Heat: खानदेशात उष्णता रोज वाढत आहे. कमाल तापमान ३९अंश सेल्सिअसवर पोचले आहे. केळीसह भाजीपाला व अन्य पिकांना उष्णतेचा फटका बसत आहे. .मजूरटंचाई वाढत असतानाच खानदेशात उष्णताही वाढली आहे. सध्या किमान तापमानही १८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. तर कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर आहे. सकाळी १० वाजेपासून ऊन तापू लागले आहे. यामुळे शेतीकामे सकाळी लवकर उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सकाळी सात ते दुपारी दीड या कालावधीत शेतीकामे शेतकरी उरकून घेत आहेत. दुपारी पाच वाजेपर्यंत उष्णतेचा फटका बसत आहे..Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णतेत वाढ.मजूरटंचाई असतानाच उष्णता वाढल्याने शेतीकामांवर परिणाम झाला आहे. केळी, भाजीपाला पिकांचे सिंचन करताना शेतकरी काटेकोर व्यवस्थापन करीत असून, सायंकाळी किंवा रात्री पिकांना पाणी दिले जात आहे. तसेच खते देण्याचे कामही सकाळीच उरकले जात आहे. उष्णता वाढल्याने पीकवाढीवरही परिणाम होईल, अशी स्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत..Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल.क्रॉप कव्हरचा उपयोगअलीकडेच केळी, पपईची लागवड झाली आहे. रोपे लहान व कोवळी असून, त्यांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकरी या पिकांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर लावून घेत आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाभोवती धैंचाची लागवड केली आहे. केळी, पपई बागांभोवती हिरवी नेटही लावून घेतली जात आहे. .उष्णतेचा फटका कलिंगड, खरबूज पिकास अधिकचा बसला आहे. यात मोठी हानी शेतकऱ्यांना सहन करावी लागली आहे. फळे नरम होऊन दर्जा घसरणे, त्यातून पाणी येणे, फळांच्या आतील भागात पोकळी तयार होऊन त्यांना चटके बसणे अशा समस्या कलिंगड पिकात तयार झाल्या आहेत. यामुळे नुकसान होत आहे. या प्रकाराने पिकात १० ते १५ टक्के हानी झाल्याची स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.