Heatwave Crop Damage: खानदेशात मागील पाच ते सहा दिवसांत कमाल तापमानात सतत वाढ झाली आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले असून, केळी, पपई, कलिंगड व अन्य फळझाडे, फळ व भाजीपाला पिके वाचविण्याची धावपळ शेतकरी करीत आहेत. .विजेची समस्या खानदेशात कायम आहे. दिवसा चार दिवस शेतीपंपांना वीज मिळते. तर रात्री तीन दिवस शेतीला वीज मिळते. दिवसा किमान सात तासही वीज मिळत नाही. आता उष्णता वाढल्याने रोहित्र खराब होणे व अन्य समस्याही तयार झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांची पिके वाचविण्याची धावपळ रात्रंदिवस सुरू झाली आहे. मध्येच वीज बंद पडते. यामुळे सिंचनाच्या कामाची गती थांबते..Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल.किमान किंवा रात्रीचे तापमानही १७ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सीअसपर्यंतच पोचले होते. परंतु मागील पाच ते सहा दिवसात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. यामुळे लहान केळी, पपई, कलिंगड बागांची हानी झाली आहे. बागांभोवती हिरवी नेट, नैसर्गिक वारा अवरोधक तयार करावे लागले आहेत. १० ते १२ टक्के नुकसान सद्यः स्थितीत केळी, पपई बागांचे झाले आहे. शेतात कामे सुरू असून, दिवसभर उकाड्याने हैराण व्हावे लागत आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा तापमान अधिक असल्याचे दिसून येते. शुक्रवारी (ता. २२) जळगाव शहरात हंगामातील सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. परंतु त्यात घटही नोंदविली गेली..Heatwave Alert: उष्मालाट दक्षतेबाबत जनजागृती करा : वर्षा मीना.दुपारी तर संपूर्ण बाजारपेठ, वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक मंदावत आहे. शिवारात दिवसा फारशी कामे सुरू असल्याचे दिसत नाही. कमाल तापमानात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला आहे. यामुळे शेतीकामे सकाळीच उरकून घेतली जात आहेत..यातच खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे आर्द्रता वाढली आहे. उकाडा वाढला असून, सायंकाळपर्यंत उष्ण वारे वाहत आहेत. रात्री ८ ते १० वाजता उकाडा कमी होतो. कलिंगड, केळी, पपई आदी पिकांना रात्री पाणी दिले जात आहे. कारण उष्णतेत सिंचन केल्यास पिकाला फटका बसू शकतो, असे शेतकरी मानतात..तज्ज्ञांचा सल्लावातावरणातील बदलामुळे आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. लहान मुले व वयोवृद्धांना उन्हाचा जास्त फटका बसला आहे. पारा वाढू लागताच ऊन लागण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तसेच नाकातून रक्त येणे, सर्दी-तापाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेत अधिक पाणी पिणे, उन्हात गेल्यास डोक्याला रुमाल लावणे, आरोग्यदायी आहार घेणे आदी सल्ले डॉक्टर देत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.