Pune News: केरळ सरकारने पडीत पडलेल्या शेतीजमिनीचा उपयोग वाढवण्यासाठी ‘नावो-धन’ ही सहकारी शेती योजना सुरू केली आहे. या योजनेत जमीनमालक आणि गुंतवणूकदार किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेती करणार आहेत, मात्र यामुळे जमीनमालकीत कोणताही बदल होणार नाही. राज्यातील सुमारे एक लाख हेक्टर पडीत जमिनीपैकी किमान ३० टक्के जमीन लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे ४ हजार ७०० एकर जमीन नोंदवली गेली असून २२० शेतकरी गटांनी सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत..जमीनमालकाचा मालकी हक्क कायम राहतो…या योजनेचा मुख्य आधार म्हणजे जमीनमालक आणि कुशल शेतकरी किंवा गुंतवणूकदार यांच्यातील सहकार्य. या पद्धतीत जमीनमालकाचा मालकी हक्क कायम राहतो. जमीन विकण्याची किंवा हस्तांतरित करण्याची गरज नसते. जमीनमालक ठरावीक कालावधीसाठी आपली पडीत जमीन शेतीसाठी देतो, तर गुंतवणूकदार किंवा शेतकरी गट त्या जमिनीवर संपूर्ण शेतीचे काम करतो..Fallow Land Sowing: नापेर क्षेत्रात कोरडवाहू दादर ज्वारी, हरभऱ्याची पेरणी .ज्यांना जमीन नाही त्यांच्यासाठी फायदा…ही योजना गुंतवणूकदार, शेतकरी गट, कृषी स्टार्टअप तसेच परदेशात राहणाऱ्या केरळमधील लोकांसाठी मोठी संधी ठरत आहे. अनेकांकडे भांडवल आणि शेतीचे ज्ञान असले, तरी स्वतःची जमीन नसल्यामुळे ते शेती करू शकत नाहीत. या योजनेमुळे त्यांना शेतीत गुंतवणूक करून उत्पादन घेता येणार आहे..अडीच लाख एकर जमीन पडीत…शासकीय आकडेवारीनुसार, केरळमध्ये सुमारे 2 लाख 47 हजार एकर लागवडीयोग्य जमीन सध्या पडीत आहे. त्यापैकी किमान ३० टक्के जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ‘नावो-धन’ योजनेत जमीनमालक आणि गुंतवणूकदार किंवा शेतकरी गट यांच्यात औपचारिक करार केला जातो..या करारानुसार, शेतीचे नियोजन, पेरणी, तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन व्यवस्थापन आणि विक्रीची जबाबदारी गुंतवणूकदार किंवा शेतकरी गटावर असते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील ठरलेला हिस्सा जमीनमालकाला दिला जातो, तर उर्वरित नफा गुंतवणूकदार किंवा शेतकरी गटाकडे राहतो. त्यामुळे जमीनमालकाला कोणताही धोका न घेता उत्पन्न मिळते, तर गुंतवणूकदारांना नफ्याची संधी मिळते..या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ४ हजार ७०० एकर जमीन नोंदवली गेली असून ती लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सुमारे २२० शेतकरी आणि गुंतवणूकदार गटांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छा दाखवली आहे. कृषी विभागाच्या मते, या योजनेमुळे पडीत जमिनीचा वापर वाढून उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.