Kolhapur News : दाजीपूर अभयारण्यात कारवी फुलांना बहर

Dajipur Wildlife Sanctuary: सात वर्षांनंतर येतोय फुलोरा ः निळ्या-जांभळ्या रंगांची अनुभूती
Karvi Flowers
Karvi FlowersAgrowon
Published on
Updated on

राशिवडे बुद्रुक

Karvi Flowers: दाजीपूर अभयारण्यातील कारवी वनस्पती आता फुलू लागली आहे. निळ्या-जांभळ्या रंगांच्या फुलांच्या बहरण्याने आता हिरवाईत निळाई डोकावू लागली आहे. तब्बल सात वर्षांच्या टप्प्याने फुलणारी ही वनस्पती पाहण्याचा एक वेगळाच आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.

दाजीपूर अभयारण्याच्या साडेतीनशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळात सर्वत्र निमसदाहरित वनस्पतीबरोबरच कारवी या वनस्पतीचे लक्षवेधी आच्छादन आहे. या वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले असून, ती आता यंदा तब्बल सात वर्षांनंतर फुलोऱ्याच्या टप्प्यावर आली आहे.

कोल्हापुरातून कोकणात जाणाऱ्या राज्यमार्गाच्या दुतर्फा आणि त्याच्याविरुद्ध दाजीपूर : दाजीपूर अभयारण्यात सध्या कारवी वनस्पती फुलत आहे. कारवीचे ‘स्टॉबिलॅन्थस कॅलोसस’ असे नाव आहे.

फुलोऱ्यात सुंदर दिसणारी ही वनस्पती असून, तिचे खोड आणि पाने लाळखुरकत या आजारावर जनावरांना प्रभावी औषध ठरते. यामुळेच जंगलातील गव्यांना व तत्सम प्राण्यांना या रोगाचा फारसा त्रास होत नाही.

Karvi Flowers
Radhanagari Sanctuary : राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

शहाजी कुरणे बाजूच्या राऊतवाडीमार्गे पर्यायी रस्त्याच्या दुतर्फा कारवीचे ताटवे आता लक्ष वेधून घेत आहेत. मोठी बोंडे आणि त्यातून उमलू लागलेल्या कळ्या, त्याची झालेली फुले, त्याचा निळा, जांभळा आकर्षक रंग मनमोहक वाटत आहे.

फुलोऱ्यानंतर या झुडपाचे आयुष्यमान संपते आणि यानंतर याच फुलांच्या मागे निर्माण होणाऱ्या बियांमधून पुन्हा नवीन कारवी उदयास येते. हे निसर्गचक्र सात वर्षांनंतर सातत्याने घडते. एकाच फुलोऱ्याच्या काळात लक्षावधी फुले उमलत असल्याने हिरव्या पानाच्या आणि जमिनीच्या मधोमध निळा छानसा पट्टा दिसून येतो.

डोळ्याला सुखद अनुभूती देणारी ही जांभळाई पाहण्याची एक वेगळीच मजा असते. विशेषकरून या काळात कारवी उमलते तेव्हा कारवीचा मध मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. या परिसरात मधुमक्षिका पालन करणाऱ्यांना कारवी उमलणारे वर्ष मधासाठी पर्वणी ठरते.

गव्यांचे आवडते खाद्य कारवीची कोवळी पाने गव्यांचे आवडते खाद्य असते. फुलोरा येऊन गेल्यानंतर बिया पडतात आणि त्या रुजतात. हे नवे अंकुरही गव्यांसाठी आवडीचे खाद्य समजले जाते. हे निसर्गचक्र या अभयारण्याने चांगले सांभाळले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com