Village Map: कन्नड नगरपरिषद हद्दीत राबविण्यात आलेल्या नक्शा पथदर्शी प्रकल्पाचे टप्पा १ चे काम पूर्ण झाले आहे. गावठाण क्षेत्रातील प्रारूप अंतिम नकाशा प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यासंदर्भात संबंधित नागरिकांनी अवलोकन करुन आपल्या हरकती व सुचना २३ पुर्वी नोंदवाव्या आवाहन उपअधीक्षक भूमि अभिलेख कन्नड कैलास निसाळ यांनी केले आहे..भूमि संसाधन विभाग, ग्रामिण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने विभागाच्यावतीने शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील मुळ व विस्तारीत भागाचे नगरभूमापन करण्यासाठी पथदर्शी स्वरुपात नक्शा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. .Revenue Department Reform: ‘वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेतून मालमत्ता नोंदणी.त्यानुसार कन्नड नगरपरिषद हद्दीतील क्षेत्रात नगरभूमापन करण्याचा नक्शा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यातील टप्पा क्रमांक १ मध्ये नगर परिषद हद्दीतील गावठाण क्षेत्रातील प्रारूप अंतिम चौकशी नोंदवही आणि प्रारूप अंतिम नकाशा ऑनलाइन तसेच नगरपालिका कन्नड कार्यालय, तहसील कार्यालय कन्नड व उपअधीक्षक भूमि अभिलेख कन्नड कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे..Village Safety Project: दानोळीत यात्रेच्या निधीतून ‘सुरक्षित गाव’ उपक्रम.कन्नड शहरातील सर्व संबंधित नागरिकांनी ही प्रारूपे पाहून अंतिम चौकशी नोंदवही आणि प्रारूप अंतिम नकाशा यांचे अवलोकन करावे व त्याबाबत खात्री करावी. नागरिकांना त्यांच्या मिळकतीबाबत तयार करण्यात आलेल्या अभिलेखांबाबत काही दुरुस्ती सुचवायची असल्यास किंवा हरकत नोंदवावयाची असल्यास ती पुराव्याच्या कागदपत्रांसह उपअधीक्षक भूमि अभिलेख, कन्नड कार्यालयात गुरुवार २३ पर्यंत लेखी स्वरूपात नोंदवावी. .अथवा https://svamitva.mahabhumi.gov.in.cses/_singup वर नोंदवावी,असे आवाहन उपअधीक्षक भूमि अभिलेख कन्नड कैलास निसाळ यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.