Jute Agriculture Experiment: जुन्नर पट्ट्यात ताग उत्पादनाचा प्रयोग
Jute Farming: जुन्नर तालुक्यात तागाचे पीक प्रामुख्याने हिरवळीचे खत अथवा कंपोस्ट खतासाठी घेतले जाते. त्यामुळे या पिकाकडे नगदी पीक म्हणून फारसे पाहिले जात नाही. मात्र, बोरी खुर्द येथील शेतकरी संपत गणपत चिंचवडे यांनी तागाच्या पिकाचा अभ्यास करून त्याचा व्यावसायिक पद्धतीने प्रयोग केला आहे.