July Rainfall: जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना जुलैमधील समाधानकारक पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सुमारे ८० टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित पेरा पुढील आठवडाभरात पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे..एक जून ते २० जुलै या ५० दिवसांच्या कालावधीत राज्यात सरासरी ४२१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा ३६८ मिलिमीटर (८७ टक्के) पाऊस झाला आहे..Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण.राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी ९८ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक (१०० टक्क्यांहून जास्त) पाऊस झाला आहे. ८७ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के, तर १२३ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये ४३ तालुक्यांत केवळ २५ ते ५० टक्के, तर चार तालुक्यांत २५ टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे..जूनमधील पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या होत्या. मात्र जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी वेगाने पेरण्या पूर्ण केल्या..गतवर्षीपेक्षा पेरण्या १३ टक्क्यांनी मागेराज्यातील १४४ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २० जुलैअखेर १०६ लाख हेक्टर (७४ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यानंतरच्या काही दिवसांत पेरणीचा वेग वाढून ती ८० टक्क्यांच्या पुढे गेल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. गतवर्षी याच कालावधीत १२५ लाख हेक्टर (८७ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा पेरणी अद्यापही गतवर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी मागे आहे..Kharif Sowing 2026 : पावसाची तूट, पेरणीला फटका; कापूस आणि सोयाबीन लागवड पिछाडीवर.कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, सिंधुदुर्ग, रायगड, गोंदिया आणि भंडारा या प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांत रोपवाटिका तयार करण्याचे काम अद्याप सुरू असल्याने भात लागवडीचे क्षेत्र कमी दिसत आहे. पुढील दोन आठवडे पाऊस अनुकूल राहिल्यास भात लागवड वेगाने पूर्ण होईल..सोयाबीन, कापूस अंतिम टप्प्यातराज्यात सोयाबीनची पेरणी ४४.३० लाख हेक्टर (९४ टक्के) क्षेत्रावर, तर कापसाची लागवड ३५.७६ लाख हेक्टर (८४ टक्के) क्षेत्रावर झाली आहे. या दोन्ही पिकांची उर्वरित पेरणी पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील एका कृषी उपसंचालकांनी सांगितले, ‘‘सध्या भात लागवडीचीच सर्वाधिक चिंता आहे. राज्यात अद्याप भाताची निम्मी लागवडही पूर्ण झालेली नाही. पुढील काळात पाऊस कायम राहिल्यास ही लागवड वेगाने पूर्ण होईल.’’.राज्याच्या एकूण खरीप क्षेत्रापैकी आता केवळ २० टक्के पेरणी बाकी आहे. भात वगळता इतर सर्व प्रमुख पिकांची पेरणी याच महिन्यात पूर्ण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे.- वैभव शिंदे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.