Dapoli Joint Agresco 2026: दापोली येथे आजपासून तीन दिवस ‘जॉइंट ॲग्रेस्को’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Joint Agricultural Research Meeting: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.