Kharif Season: जव्हार तालुक्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच अनुषंगाने शेतकरी सर्व जिन्नस गोळा करू लागला आहे. मात्र, खत मिळविताना आधार क्रमांक, बायोमेट्रिक पडताळणी, जमिनीची माहिती ऑनलाइन नोंदवणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. .खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. पण खत खरेदीसाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या मोबाइलमध्ये एफएसएएस ॲप डाउनलोड करून शेती पिकाची माहिती भरावी लागत आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या क्यूआर कोडद्वारे खतासाठी १५ दिवस आधी ऑनलाइन बुकिंग करणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेटची मोठी समस्या असल्याने मुदत संपल्यानंतर पुन्हा ई-पॉस मशीनवर माहिती भरावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. .Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना.तर खत विक्रेत्यांना दिलेल्या ९५ टक्के पॉस मशीन्स तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याने व्यापारीही हैराण झालेत. त्यामुळे किमान खरिपाचा महिनाभराचा काळ जाऊ द्यावा, नंतर ही प्रणाली लागू करावी, अशी मागणी होत आहे. ऑनलाइन खत प्रक्रिया तातडीने बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने खत वितरण सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..शेतकऱ्यांची आर्थिक लूटविक्रेत्यांकडे थेट आगाऊ नोंदणी होत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटरवर (सीएससी) धाव घ्यावी लागत आहे. या केंद्रांवर खत नोंदणीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये घेऊन लुबाडणूक केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे..QR Code Fertilizer Distribution: कोल्हापुरात जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे खत वितरण सुरू.खत खरेदीसाठी फार्मर आयडी शोधणे, जमिनीनुसार मर्यादित खत नोंदणी, क्यूआर कोडच्या सक्तीमुळे सामान्य शेतकरी त्रस्त झाला आहे. ग्रामीण भागात इंटरनेट चालत नसल्याने पेरण्या रखडण्याच शक्यता आहे.- संदीप भडांगे, शेतकरी.सर्व्हर डाऊन संदर्भात शेतकरी, विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच तांत्रिक अडचणींची सविस्तर माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आली आहे.- जयराम अढळ, कृषी अधिकारी, जव्हार.ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क, विजेची समस्या आहे. यामुळे खत खरेदी प्रक्रियेत मोठे अडथळे येत आहेत. शासनाचा पारदर्शकतेचा हेतू चांगला असला, तरी ग्रामीण परिस्थितीचा विचार करून प्रणाली राबवावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही.- पंकज गवळी, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.