Jarndeshawar Sugar Factory : 'जरंडेश्वर'च्या संचालकांचा जामीन मंजूर ; मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

Jarandeshwar Sakhar Karkhana : राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने जप्तीची कारवाई केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकासह तिघांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
Sugar Factory Election
Sugar Factory ElectionAgrowon

Jarandeshwar Case : राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेचा यांचा मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Sugar Factory Election
ईडीला मिळाली जरंडेश्वर जप्तीची परवानगी

सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बॅंकेने २०१० साली लिलावात काढला होता. हा कारखाना गुरू कमोडिटी प्रा. लि. या कंपनीने अवघ्या ६५ कोटी ७४ लाखाला विकत घेतला. त्यामुळे माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात रान उठवले आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुमारे ९६ कोटी रुपयांचे कर्ज जरंडेश्वर साखर कारखान्याला दिले. त्यावरून ईडीने जरंडेश्वरची मूळ किंमत कमी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात या बँकांनी कर्ज दिल्याचा ठपका घेऊन जप्तीची कारवाई केली.

तसेच संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळावा, यासाठी कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व गुरू कमोडिटीजचे जवाहरलाल छाजेड, सीए योगेश बगरेचा यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने प्रत्येकी दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. मात्र आरोपींनी देश सोडून जाऊ नये, पुराव्याशी छेडछाड करू नये, साक्षीदारांवर दबाव टाकू नये अशा अट लावण्यात आल्या आहेत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com