
Washim News : वाढती पाणीटंचाई आणि खालावत चाललेली भूजल पातळी या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेले ‘वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा २०२५’ हे पाऊल आता एक सशक्त जलचळवळ ठरते आहे. या उपक्रमात जनुना खुर्द गावाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत संपूर्ण जिल्ह्याला दिशादर्शक उदाहरण घालून दिले आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी आमदार किरणराव सरनाईक, आमदार श्याम खोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.बुवनेश्वरी एस. यांनी सांगितले, की ‘जलताऱ्यांतून उगम पावलेली ही चळवळ ‘ॲसपिरेशनल टू इन्सपिरेशनल’ वाटचालीचे मूर्त स्वरूप आहे.
लोकसहभागातून साकारलेले हे उदाहरण इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.’ स्पर्धेत मालेगाव तालुक्यातील कोळदरा दुसऱ्या तर रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द तिसऱ्या क्रमांकावर आले. तालुकास्तरावर तामसाळा, कंकरवाडी, वसंतनगर, ईरळा, नागी आणि गायवळ या गावांनी प्रथम क्रमांक पटकावले.
डॉ. हरीष बाहेती यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमात स्मार्ट पेरणी यंत्रांचे लकी ड्रॉद्वारे वितरण करण्यात आले. यंत्रांचे फायदे उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी सांगितले. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, स्वयंसेवी संस्थांचे योगदान आणि जलतारासारख्या उपायांमुळे उगम पावलेली एकात्मिक जलजागरूकता आहे.
पाणी फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, समता फाउंडेशन यांचा मोलाचा सहभाग होता. ‘वॉटर हिरोज’ म्हणून उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मानही या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश सोमाणी, इरफान सय्यद आणि डॉ. काळे यांनी केले. उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.