Modern Farming Technique: जालना- खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. खरीप, रब्बी, फळबागांसह विविध पीकपद्धती, पूरक व प्रक्रिया आदी सर्व शाखांमधील ज्ञान- तंत्रज्ञानाचा प्रसार केव्हीकेने केला आहे. सर्वांत महत्त्वाचे ज्ञानाच्या प्रसारासाठी शेतकऱ्यांचे संघटन करून विविध उपक्रम व प्रकल्प राबविण्यात केव्हीकेचे सातत्य आहे. फलोत्पादनातीलही विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी येथे उपलब्ध आहे..जालना शहरापासून चार किलोमीटरवरील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) राज्यात प्रसिद्ध आहे. जालना येथील मराठवाडा शेती साह्य मंडळाच्या अंतर्गत व मंडळाचे सचीव विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली केव्हीके कार्यरत आहे. केंद्राचे एकूण २० हेक्टर प्रात्यक्षिक प्रक्षेत्र आहे..त्यात विविध पिके, फळबागा, भाजीपाला, फुलशेती, चारापिके आदींच्या सुधारित जाती, सिंचन पद्धती यांची प्रात्यक्षिके घेतली जातात. केंद्रात १६ शास्त्रज्ञ व कर्मचारी कार्यरत आहेत. डॉ. एस. व्ही. सोनुने यांच्याकडे केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुखपद अशी जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीला सहा विषय विशेषज्ञ, तीन कार्यक्रम सहायक आहेत. मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या पीक पद्धतींसह फळपिके व फुलशेतीवरही केव्हीकेने भर दिला आहे..Modern Farming: योजनांचा लाभ घ्या, शेती आधुनिक करा.केव्हीकेतील निवडक सुविधा. तंत्रज्ञान (प्रामुख्याने फलोत्पादनातील)मोसंबी, आंबा, जांभूळ, डाळिंब, आवळा, केळी, टोमॅटो, मिरची आदींचे तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन.तसेच रोपे-कलमे उपलब्ध.मोसंबीतील डायबॅक, डिंक्या रोग, फळगळ आदींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना.मोसंबीतील फळातील रस शोषणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी आधुनिक प्रकाश सापळ्याचा वापर.शेवग्याच्या पीकेएम-२ वाणाचा प्रसार.सीताफळाच्या बालानगर वाण व लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार.फिरती माती व पाणी तपासणी प्रयोगशाळा.फुलशेती लागवड तंत्रज्ञान.ठिबक सिंचन पॉली मल्चिंग तंत्रज्ञानट्रायकोडर्मा तसेच अन्य मित्रबुरशींवर आधारित कीटकनाशकांचा पुरवठा.पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सामूहिक शेततळे, पॅक हाऊस, शेडनेट हाउस, गांडूळ शेड या बाबत तांत्रिक मार्गदर्शनासह प्रकल्प प्रस्तावनिर्मितीसाठी साह्य..प्रमुख उपक्रमशेतांवरील चाचण्या, प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण कार्यक्रम हे केव्हीकेचे प्रमुख उपक्रम असून ते विशिष्ट गावांमध्ये सलग तीन- चार वर्षे राबविण्यात येतात. शेती दिन, मेळावे, शिवार फेरी, अभ्यास सहली, लेख, यशोगाथा आदींच्या माध्यमातून प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. अशा उपक्रमांमधून २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होतो. दर महिन्याच्या पाच तारखेला न चुकता केव्हीकेमध्ये स्वखर्चाने पूर्वनियोजित विषयावर चर्चासत्र घडवून आणण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून राबवला जातो. आजवर ३४० मासिक चर्चासत्रे झाली असून ५७० हून अधिक विषयांवर मार्गदर्शन झाले आहे..मागील चर्चासत्रावर आधारित प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित केला जातो. यात सलग पाच प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या सभासद शेतकऱ्याला चांदीचे नाणे बक्षीस देण्याचा अभिनव उपक्रमही मंडळामार्फत राबविला जातो. विशेष म्हणजे उपस्थित शेतकऱ्यांसाठी अन्नदान आणि चांदीची नाणी देण्यासाठी आर्थिक तरतूद शेतकऱ्यांमार्फतच केली जाते. प्रत्येक चर्चासत्रास २०० पासून ते ६०० पर्यंत शेतकरी उपस्थित असतात. शेजारील जिल्ह्यातूनही शेतकऱ्यांची उपस्थिती असते..Modern Farming: गोवेल गावात आधुनिक शेतीची क्रांती.द्राक्षाचे गाव आले पुढेकृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पाण्याची गरज भागविण्यासाठी कुंडलिका नदीवरून पाइपलाइन उभारण्यात आली आहे. दररोज सुमारे पाच ते सात लाख लिटर पाण्याचे शुद्धीकरण करून प्रक्षेत्राची गरज भागविली जाते. याशिवाय ५० लाख लिटरची दोन मोठी तर १० लाख लिटरचे लहान शेततळे उभे करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची, शिवनी आणि आसरखेडा या गावांमध्ये झालेल्या पाणलोट प्रकल्पाद्वारे केव्हीकेची राज्य आणि देश पातळीवर ओळख झाली. .शास्त्रशुद्ध नियोजनातून कडवंची गावाचे एकूण उत्पादन ७७ लाखांवरून २० कोटी रुपयांपर्यंत पोचण्यास त्यामुळे मदत झाली. तीनशे एकरांपेक्षा जास्त द्राक्ष लागवड झालेल्या या गावाची द्राक्षाचे गाव अशी ओळख निर्माण झाली. सन २०१२ च्या भीषण दुष्काळात केवळ शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करीत द्राक्षाचे यशस्वी उत्पादन घेतले. पाण्याच्या ताळेबंदाची संकल्पना मांडून शिवनी गावाने देशपातळीवर आदर्श उदाहरण तयार केले. शिवणी आणि आसरखेडा या दोन्ही गावांमध्ये फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळाली आहे..प्रयोगशील दांपत्य शेतकरी गटशेतीत महिलांचे योगदान मोठे आहे. त्यादृष्टीने प्रयोगशील दांपत्य शेतकरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यात दर महिन्याच्या अमावास्येला गटातील दांपत्याच्या शेतावर भेट देऊन शिवार फेरी करावी व त्यांनी केलेले अभिनव प्रयोग आपल्या शेतात राबवावेत असा हा उपक्रम आहे. या मंडळांनी बचत गटही स्थापन केला असून, दर महिन्याला ठरावीक रक्कम संकलित करण्यात येते. आजपर्यंत मंडळाच्या एकूण १२१ बैठका झाल्या आहेत..तंत्रज्ञान महोत्सव, कृषी सल्लादरवर्षी केव्हीकेतर्फे तीन दिवसांचा कृषी तंत्रज्ञान महोत्सव घेण्यात येतो. व्याख्याने व प्रक्षेत्रावरील पीक प्रात्यक्षिकांना भेटी असे त्याचे स्वरूप असते. मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी हजेरी लावतात. दरवर्षी धूलिवंदन आणि कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी केव्हीकेत स्नेहसंमेलनासारखा कार्यक्रम घेण्यात येतो. सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. पाचशे ते एकहजारांपर्यंत शेतकरी या वेळी उपस्थित असतात. नाबार्डच्या सहकार्याने विशिष्ट प्रथमदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ५० गावांची निवड करण्यात आली आहे. .त्यातील शेतकरी मंडळांमार्फत पाच हजार शेतकऱ्यांना भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त होणारे हवामान आधारित कृषी संदेश मोबाईलवर मराठी भाषेत पाठविण्यात येतात. आजपर्यंत ५०० संदेश सुमारे सातहजार शेतकऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. प्रकल्पांतर्गत केव्हीकेस ड्रोन देण्यात आला आहे. तीन वर्षांपासून त्या अंतर्गत शेतकऱ्यांकडील २५६ हेक्टर क्षेत्रावर ड्रोन प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना गरजेनुसार अल्प दरात ड्रोन उपलब्ध करून देण्यात येतो. शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येते..पुरस्कारांनी सन्मानभारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र म्हणून पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. याशिवाय वनश्री तसेच वसंतराव नाईक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.डॉ. एस. व्ही. सोनुने ९०२८२५४९४६(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी) अजय मिटकरी ९०२८२५४९४७ (विषय विशेषज्ञ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.