Jalna News : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध व्हावे याकरिता शासनाकडे ४२१ कोटी ४१ लाख ४७ हजार २२५ रुपयांचा प्रस्ताव सादर केला, असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. .जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आठही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तूर, उडीद, मूग, भुईमूग, भाजीपाला, मिरची, भुईमूग, कांदा, ऊस, हळद, टोमॅटो, टरबूज, सोयाबीन, यासह अन्य फळबागांचा समावेश होता. .Crop Damage Compensation : अहिल्यानगरच्या तेरा तालुक्यांत नुकसानीपोटी मिळणार मदत.अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उप जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद यंत्रणा, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणेने युद्ध पातळीवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले. .Crop Damage Compensation : केळी, लिंबू उत्पादकांना भरपाईची अपेक्षा.शासन निर्णयानुसार जिरायती क्षेत्रासाठी ८५०० प्रति हेक्टर, बागायती क्षेत्रासाठी १७००० रुपये प्रति हेक्टर तर फळपिकांसाठी २२ हजार ५०० प्रति हेक्टर याप्रमाणे निधीची मागणी करण्यात आली आहे. अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेचच वाटप करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे..४ लाख ४९ हजार २८२ हेक्टरवर नुकसानजालना जिल्ह्यात एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या ६०३३९३ एवढी असून, यामध्ये जालना तालुक्यांतील ८६४३३, बदनापूर ६४९३३, भोकरदन १०८४७१, जाफ्राबाद ३३२६९, परतूर ५०५१८, मंठा ५८४०८, अंबड १०५७९१, घनसावंगी ९५५७० एवढ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्हात एकूण ४४९२८२ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्र ४२०५४९ हेक्टर, बागायती क्षेत्र १२७५ हेक्टर, फळपिके २७४५८ हेक्टरचा समावेश असल्याचे प्रशासनाने कळविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.