Lemon Rate In Jalgaon : वाढत्या मागणीने लिंबू दरात सुधारणा

Lemon Market Price : खानदेशात जळगावात जामनेर, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव भागात लिंबू पीक अधिक आहे.
Lemon Rate
Lemon RateAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : काही दिवसांपूर्वी दहा रुपयांत दहा ते पंधरा नग मिळणाऱ्या लिंबांना (Lemon Demand) आता मोठी मागणी आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच त्यांचे दरही सुधारले आहेत.

बाजारात शेतकऱ्यांकडून प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये या दरात लिंबांची खरेदी केली जात आहे. किरकोळ बाजारात त्याचे दर ८० रुपये प्रतिकिलोवर आहेत.

खानदेशात जळगावात जामनेर, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव भागात लिंबू पीक अधिक आहे. धुळ्यात शिरपूर, धुळे व साक्री भागात लिंबू बागा आहेत. सुमारे एक हजार हेक्टरवर लिंबू पीक खानदेशात आहे. सध्या या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

लिंबूसरबत गुणकारी असल्याने खाण्यातही लिंबू मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतो. याशिवाय रसवंतिगृहे, ज्यूस सेंटर आदी ठिकाणी लिंबू जास्त वापरला जातो. लिंबांची किंमत वाढल्याने त्याच्याशी संबंधित शीतपेयांच्या किमतीही आपोआपच वाढल्या आहेत.

Lemon Rate
Lemon Market Rate : नगरमध्ये लिंबाला ३००० ते ११००० रुपये दर

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच दर वाढल्यामुळे येत्या काही दिवसात लिंबू दरात आणखी सुधारणा होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मे महिना संपेपर्यंत तरी हेच चित्र बाजारात राहण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांत झालेल्या आवकाळी पावसामुळे लिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी पावसाने लिंबू फळगळ झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. लिंबाला वर्षातून दोन ते तीन वेळा बहर येतो.

मात्र, त्यातील सर्वच बहार हाती लागत नाही. पावसाळ्यात येणारा बहारातून फारसे उत्पन्न मिळत नाही. उन्हाळ्यात मात्र लिंबास जास्त मागणी असते.

यंदा मात्र उन्हाळ्याच्या सुरवातीलाच ढगाळ वातावरणाने लिंबू उत्पादकांना फटका बसून मागणी घट झाली. उन्हाचा चटका जाणवू लागताच लिंबांच्या मागणीतही वाढ झाली आहे.

अवकाळी पावसामुळे लिंबांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. मात्र असे असले तरी सध्याच्या भावामुळे समाधानकारक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.- मालती बोरसे, शेतकरी, वावडे (ता.अमळनेर, जि.जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com