डॉ. दीपक सावळे, डॉ. गोविंद येनगे, डॉ. विद्यासागर गेडामगूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ असून त्यामध्ये कॅल्शिअम, लोह, स्फुरद, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यांसारखी खनिजे तसेच अल्प प्रमाणात जीवनसत्त्वे आढळतात. त्यामुळे गूळ हा केवळ गोडी देणारा पदार्थ नसून तो पोषणमूल्यांनी समृद्ध असा अन्नघटक आहे. दैनंदिन आहारात मर्यादित प्रमाणात गुळाचा समावेश केल्यास आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे मिळतात..गुळ हा आहारातील महत्त्वाचा भाग असून आयुर्वेदात गुळाला औषधी महत्त्व आहे. हिवाळ्यात आपले चयापचय मंदावते आणि आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत गूळ त्याच्या उबदार गुणधर्मांसह एक उत्कृष्ट नैसर्गिक ऊर्जा बूस्टर म्हणून उपयुक्त ठरतो. गूळ केवळ अन्नाला गोडी आणण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ नसून तो पचनास हलका, रुची वाढविणारा आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असा अन्नघटक आहे. त्यामुळे दैनंदिन आहारात मर्यादित प्रमाणात गुळाचा समावेश केल्यास आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे मिळतात..Healthy jaggery : गूळ खाण्याचे फायदे काय आहेत?.आरोग्यदायी महत्त्वऔषधी गुळाचे वापर फार पूर्वीपासून अनेक रोगांवर उपचारासाठी केला जात होता. गुळाच्या औषधी गुणधर्माच्या नोंदी दिसून येतात. गूळ वेगवेगळ्या अन्नपदार्थाबरोबर घेतल्याने वेगवेगळे फायदा मिळतात.गूळ आल्यासोबत घेतल्याने कफ दूर होतो.हिरड्याबरोबर घेतल्याने पित्त कमी होते.सुंठेबरोबर थोडे तूप घालून लिंबा एवढी गोळी घेतल्याने पावसाळ्यात व हिवाळ्यात वायूचा नाश होऊन भूक चांगली लागण्यास मदत होते.दैनंदिन आहारात गुळाचे सेवन केल्यास सांधेदुखीचे विकार थांबण्यास तसेच पित्ताशयाची कार्यक्षमता बळकट होण्यास मदत मिळते असे आयुर्वेदात संदर्भ आढळून येतात..खनिजे व क्षार असल्याने कष्टाचे काम करणाऱ्या लोकांसाठी गूळ हा ऊर्जा देणारा उत्तम अन्नघटक आहे.गुळामध्ये कॅल्शिअम, लोह, तांबे, स्फुरद इत्यादी खनिजे काही प्रमाणात प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे आढळून येतात.कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत ठेवायला मदत करते. लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवायला उपयुक्त असते. तांबे लोह शोषणास मदत करते. स्फुरद हाडे व पेशींसाठी आवश्यक असते..Healthy jaggery : आरोग्यवर्धक गुळाचे फायदे जाणून घ्या.गूळ आहारात वापरल्याने लघवी साफ होते.हृदयाच्या पेशींना शक्ती मिळते.कावीळ झालेल्या व्यक्तींसाठी आरोग्यवर्धक असतो.जनावरांसाठी खाद्य, आयुर्वेदिक औषध निर्मिती, सौदर्य प्रसाधन निर्मिती, बेकरी मालाचे उत्पादन इत्यादी बऱ्याच ठिकाणी गुळाचा वापर केला जातो.मानवी शरीराच्या निकोप वाढीसाठी दैनंदिन आहारात गुळाचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र गूळ आणि काकवी तेवढीच दर्जेदार, निर्जंतुक आणि रासायनिक पदार्थ विरहित असणे जरुरीचे आहे..गूळ आणि साखरेमधील फरकगूळ आणि साखर हे दोन्ही उसापासून बनवले जातात. परंतु त्यांच्या निर्मितीप्रक्रियेत आणि पोषणमूल्यात मोठा फरक आढळतो. साखर अत्यंत शुद्ध केलेली असते. साखर निर्मितीच्या प्रक्रियेत उसाच्या रसावर विविध रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियेमुळे रसातील बहुतेक सर्व जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय घटक नष्ट होतात. त्यामुळे साखर ही केवळ सुक्रोजयुक्त ऊर्जा देणारी असून पोषणमूल्य जवळ जवळ शून्य असते. याउलट गूळ ही एक अपरिष्कृत नैसर्गिक साखर आहे. ती कोणत्याही रसायनांचा वापर न करता फक्त उसाचा रस उकळवून तयार केली जाते. त्यामुळे गुळात लोह, कॅल्शिअम, स्फुरद, पोटॅशिअम तसेच काही जीवनसत्त्वे टिकून राहतात..Jaggery Nutrition Benefits : गुळामध्ये कोणते पोषक तत्व असते?.गुळापासून विविध उत्पादनेगूळढेप, गुळाच्या वड्या, काकवी, गूळ पावडर.गुळावर आधारित मूल्यवर्धित पदार्थगूळ कुकीज (नानकटाई) ः बेकरी उद्योगात प्रचलित कुकीज (नानकटाई) तयार करण्यासाठी मैद्याच्या एकूण वजनापैकी ३० टक्के प्रमाणात नाचणी पीठ घेऊन कुकीज बनविता येतात. त्यासोबत साखरेऐवजी एकूण पिठाच्या वजनाच्या ५० टक्के प्रमाणात गुळाचा वापरल्यास अधिक पौष्टिक आणि रुचकर कुकीज तयार करता येतात. या कुकीजमध्ये प्रथिने, क्रूड फायबर, राख आणि कर्बोदके इत्यादींचे प्रमाण मानवी आहाराच्या दृष्टिकोनातून चांगले आढळून आले आहे..गूळ चॉकलेट आणि कॅण्डी ः साखरे ऐवजी गुळाच्या गोळ्या किंवा चॉकलेट तयार करता येतात. यामध्ये आले किंवा आवळा घालून औषधी कॅण्डी देखील बनवता येते.लाडू : शेंगदाणे, खोबरे, तीळ, सुका मेवा घालून गुळाचे ऊर्जादायी व पौष्टिक लाडू तयार करता येतात.चिक्की/रेवडी ः गूळ, शेंगदाणे, तीळ वापरून चिक्की किंवा रेवडी बनवल्या जातात. ज्यांना विविध फ्लेवर्सही दिले जातात.गूळ पोळी, गूळ बेसनाचे पेढे ः दैनंदिन आहारासाठी लगेच बनविता येतात.गूळ-फ्लेवर पेये ः गूळ सरबत, साखर नसलेली एनर्जी ड्रिंक व आयुर्वेदिक घटकांसह हर्बल ड्रिंक्स..गुळाचे सेवन कुणी करू नये?गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो. म्हणूनच, मधुमेह, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) ग्रस्त असलेल्या लोकांना गुळाचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला दिला जातो.- डॉ. दीपक सावळे, ०२३१- २६५१४४५ (लेखक अखिल भारतीय समन्वित काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संशोधन प्रकल्प,प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर येथे वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.