Animal Husbandry Business : जनावरांसाठी पौष्टिक झाडपाल्याचा वापर

trees for animal fodder : पडीक जमिनीवर जल-मृद्‍संधारणासाठी या झाडांची लागवड फायदेशीर ठरते. आपल्याकडे अजूनही चाऱ्यासाठी झाडांची लागवड या संकल्पनेकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही.
Animal Husbandry Business
Animal Husbandry BusinessAgrowon
Published on
Updated on

अमित गद्रे

गेल्या काही वर्षांत पशुपालन हा मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे जातिवंत जनावरांच्या संगोपनाच्या बरोबरीने सकस चारा उपलब्ध होणे आवश्यक झाले आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्यासाठी वर्षभर विविध पिकांची लागवड वाढल्याने चारा लागवड कमी होऊ लागली आहे. गावशिवारात परंपरेने राखलेले गायरान, चराऊ कुरणांचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे सकस चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण गंभीर झाला आहे.

आपल्याकडील डोंगरी भागातील गवताचा सकसपणा कमी असल्याने जनावरांचे पुरेसे पोषण होण्यासाठी मर्यादा आहेत. हे लक्षात घेता डोंगरी भाग तसेच शेती बांधावर पशुपोषणासाठी उपयुक्त झाडांची लागवड करून त्यांच्या हिरव्या पानांचा उपयोग चाऱ्यासाठी करणे शक्य आहे. काही झाडाझुडपांची पाने द्विदल चाऱ्याइतकीच पौष्टिक असतात. त्याचा जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. ज्या ठिकाणी पारंपरिक पिकांची लागवड शक्य नाही, डोंगर उताराची जमीन, खारवट- चोपण जमीन, पाणथळ जमिनीमध्ये चाऱ्यासाठी उपयुक्त झाडांची लागवड करता येते.

Animal Husbandry Business
Department of Animal Husbandry : सिंधुदुर्गात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

या झाडांची दुष्काळी स्थिती सहन करण्याची क्षमता चांगली असल्याने पडीक जमीन तसेच शेती बांधावर लागवड करणे पशुपालकांना शक्य आहे. चारा उत्पादन होत असताना दुय्यम उत्पादन म्हणून जळाऊ लाकूडदेखील काही प्रमाणात उपलब्ध होते. याचबरोबरीने पडीक जमिनीवर जल-मृद्‍संधारणासाठी या झाडांची लागवड फायदेशीर ठरते. आपल्याकडे अजूनही चाऱ्यासाठी झाडांची लागवड या संकल्पनेकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. परंतु काळाची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पडीक जमीन किंवा बांधावर विविध प्रकारच्या चारा वृक्षांची लागवड करणे आवश्यक झाले आहे. पशुपालनाच्या बरोबरीने बंदिस्त शेळीपालनासाठी देखील पुरेसा चारा उपलब्ध होऊ शकतो.

चाऱ्यासाठी कोणती महत्त्वाची झाडे आहेत याची माहिती होण्यासाठी कृषी पदवीधर कृष्णाजी महादेव कोकाटे यांनी ‘झाडेझुडपे लावा, पशुधन जगवा‘ हे पुस्तक लिहिले आहे. कोकाटे यांनी बाएफ संस्थेमध्ये जलसिंचन विकास, फळबाग विकास, तुती लागवड, वन आणि कृषिवनशेती, वन आणि फळबाग विकास तसेच चारा पिकांतील संशोधन आणि तंत्रज्ञान विस्तारामध्ये मोलाचे काम केले आहे. या अभ्यासातून त्यांनी या पुस्तकामध्ये चाऱ्यासाठी उपयुक्त ३९ झाडांची सखोल माहिती दिली आहे. पुस्तकामध्ये बेल, तुती, हादगा, शमी, विलायती चिंच, पिंपळ, अंजन, शेवरी, सुबाभूळ, शेवगा, महारूख, खैर, मोह, अर्जुन, बेहडा, हिवर, आपटा, बकाणनीम, धावडा, साल आदी चाऱ्यासाठी महत्त्वाच्या झाडांची सविस्तर माहिती मिळते.

Animal Husbandry Business
Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

लागवडीसाठी जमीन, पाऊसमानानुसार झाडांची निवड, चाऱ्यासाठी जाती, लागवडीचे तंत्र, वाढीचे टप्पे, कापणीचा कालावधी आणि पद्धत, पानातील पौष्टिक घटक, चारा साठवण आणि मूरघासनिर्मिती याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले आहे. या झाडांची रंगीत छायाचित्रे पहाण्यासाठी पुस्तकामध्ये क्यूआर कोड देखील दिला आहे. पशुपालक, विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे.

पुस्तकाचे नाव : झाडेझुडपे लावा, पशुधन जगवा
लेखक : कृष्णाजी महादेव कोकाटे
प्रकाशक : सकाळ मीडिया प्रा.लि. पुणे
किंमत : २९९ रुपये
संपर्क : ८८८८८४९०५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com