Indian Agriculture : पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे : गजानन तुपकर

Agri Business : शेती व्यवसाय हा आज विविध पद्धतीने केला जातो व अत्याधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून केला जातो आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Akola Agriculture News : ​शेती व्यवसाय हा आज विविध पद्धतीने केला जातो व अत्याधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून केला जातो आहे. आंतरपीक पद्धतीतून पिकांची उत्पादकता वाढवणे, शेतीमध्ये विविधता आणणे, शाश्‍वतता आणणे, पर्यावरणपूरक पीक पद्धतीने नफ्याचे प्रमाण वाढवणे यावर भर देण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने कृषी विभाग बाळापूर व (आत्मा) यांच्या वतीने प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. मुरली इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, प्रकल्प उपसंचालक मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मौजे निमकर्दा येथे पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानांतर्गत तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्राचे गजानन तुपकर यांनी सांगितले, की फळबाग लागवड करण्यापूर्वी माती व पाणी परीक्षण तसेच फळबाग व भाजीपाला पिकाकरिता जैविक पद्धतीने कुंपणाकरीता सागरगोटी, करवंद, सीताफळ, शेवगा या फळझाडांचा वापर, ज्या परिसरात पाण्याची टंचाई, कमतरता आहे.

Indian Agriculture
Organic Farming : सेंद्रिय शेती गोसंवर्धन काळाची गरज

तिथे जैविक आच्छादनाचा वापर, वनशेती वाढली तर तापमान नियंत्रण होईल. तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीस बंदी, कुऱ्हाड बंदी करून चराऊ कुरणांना प्राधान्य, प्लॅस्टिक बंदी शेतीला पूरक म्हणून जंगल संवर्धन, पाण्याचा सन्मान आणि सेंद्रिय शेती पद्धतीत पारंपरिक बी-बियाणे अशा अनेक मोलाच्या गोष्टीचा अवलंब केल्यास निश्चितच प्रगती होऊ शकते असे मार्गदर्शन करताना सांगितले.

आत्मा यंत्रणाचे तालुका अधिकारी व्ही. एम. शेगोकार यांनी घरचे सोयाबीन उगवण शक्ती तपासणी, नॅनो युरिया, आत्मा योजना, एकात्मिक कीडरोग नियंत्रण, खरीप हंगामातील लागवड तंत्र व कृषी विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सचिन जामोदे, उपसरपंच रमेश इंगळे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ गजानन तुपकर, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, आत्मा यंत्रणाचे वी एम शेगोकार, कृषी सहाय्यक धनंजय मोरे, माजी उपसरपंच दत्ता पाथरकर,बद्रीशेठ अग्रवाल, गोपाल वंजारे, शेतकरी महिला गटाच्या अध्यक्षा श्रद्धा खेडकर सविता माहुरे, गोकर्ण गांधी, मंगला माहुरे, कृषीताई रंजना इंगळे, दिगंबर खडसे अक्षय शेंडे, सचिन खेडकर व कृषिमित्र विनोद खेडकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com