Grape Crop Management : फळछाटणीपूर्वी द्राक्षकाडीची तपासणी महत्त्वाची

Grape Crop Farming : द्राक्षाची फळछाटणी ही प्रत्यक्ष उत्पादनाशी निगडित असून, व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते. फळछाटणीपूर्वी काडी तपासणी करणे गरजेचे आहे.
Grape Vine Yard Management
Grape Vine Yard ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. स. द. रामटेके

Grape Prunning : द्राक्षाची फळछाटणी ही प्रत्यक्ष उत्पादनाशी निगडित असून, व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते. फळछाटणीपूर्वी काडी तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र अनेक द्राक्ष बागायतदार त्याकडे दुर्लक्ष करतात.

हे दुर्लक्ष करणे उत्पादनावर विपरीत परिणाम करणारे ठरते. कारण काडी तपासणीच्या निष्कर्षातूनच काडीच्या नेमक्या कोणत्या डोळ्यांवर घड आहे हे निश्‍चित करता येते. घड नसल्यास छाटणी घेऊनही फारसा उपयोग होत नाही.

म्हणजेच छाटणीदरम्यान झालेली ही छोटी चूकदेखील पूर्ण वर्षभराची मेहनत वाया घालवू शकते. यासाठी काटेकोरपणे द्राक्ष काडीची तपासणी करून घ्यावी. द्राक्ष फळछाटणीनंतर काडीवरील ठरावीक डोळ्यांमधून फूट येणे आणि त्यातील घडांचा विकास होणे महत्त्वाचे असते.

त्यामुळे छाटणीचे नियोजन करताना द्राक्ष काडीची तपासणी, प्रत्यक्ष छाटणी करताना योग्य काळजी घेणे आणि एकसारख्या फुटी येण्यासाठी रसायनाचा वापर करणे या तीनही टप्प्यांवर लक्ष दिले पाहिजे.

द्राक्ष काडीची घडांसाठी तपासणी ः
फळछाटणी घेण्याआधी कमीत कमी १५ दिवस आधी काडीचा नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा. हा नमुना बागेतील काड्याची विविधता लक्षात घेऊन प्रतिनिधिक स्वरुपाचा असावा.

त्यासाठी फळ छाटणीच्या वेळी बागेतील एकसारख्या जाडीच्या ८ ते १० काड्या गोळा कराव्यात. काडी तपासणीसाठी एक डोळा सोडून काडी काढून घ्यावी. काढलेल्या काड्या ओल्या गोणपाटमध्ये गुंडाळून पाणी मारून ठेवाव्यात.

काड्या काढल्यानंतर डोळे तपासणीकरिता १० ते १२ तासांच्या आत प्रयोगशाळेत पाठवाव्यात. या काड्यांवरील प्रत्येक डोळ्यांची तपासणी सूक्ष्मदर्शिकेखाली केली जाते. त्यावरून काडीच्या कोणत्या डोळ्यामध्ये चांगला घड आहे, याचे निदान होईल.

त्यावरून फळछाटणी घेणे सोपे होते. काडीवर असलेल्या डोळे व त्यातील फलदायक डोळ्यांचा तपशील साधारणपणे पुढील उदाहरणाप्रमाणे दिलेला असू शकतो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Grape Vine Yard Management
Grape Crop Management : सांगलीत द्राक्ष फळछाटणी सुरू

काडीवर घड असलेले डोळे यांचा तपशील ः
काडीचा क्र.---मुख्य काढीवरील फळदायक डोळा---सबकेनवरील फळदायक डोळा
१ --- २ --- ३ --- ४ --- ५ --- ६ --- ७ --- ८ --- ९ --- १० --- जॉईंट --- १ --- २ --- ३ --- ४ --- ५
१ --- ०० --- ०० --- ०० ---
२ एन
३ एस
४ एन एस

= घड असलेला डोळा एन = घड नसलेला डोळा एस = लहान घड

प्रयोगशाळेमध्ये काड्यांची तपासणी केल्यानंतर मिळालेले निष्कर्ष ः
१) मुख्य काडीवर डोळा क्र. ६, ७, ८ हे फळदायक डोळे आहेत.
२) सबकेनवरील डोळा क्र. १ हा फळदायक डोळा आहे. म्हणजेच त्यात घड असल्याचे दाखवतो. डोळा क्र. २ मध्ये लहान घड असल्याचे दिसून येते.

खरड छाटणीच्या वेळी काडीतील काही डोळ्यांमधून सूक्ष्मघड निर्मिती होते. घड निर्मितीवर अनेक घटकांचा प्रभाव होत असल्याने काडीवरील फळधारक डोळ्यांची ठेवण परिस्थितीनुसार बदलते. त्यामुळे फळ छाटणीपूर्वी डोळ्यांची तपासणी करून फळधारणेची परिस्थिती समजावून घेता येते. साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यांत हवामान ढगाळ असते.

त्याचा सूक्ष्मघड निर्मिती, तसेच पोषणावर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये काडी तपासणी करून उत्पादन घेण्यासाठी नियोजन करणे शक्य होते. पाऊस व रोगांमुळे डोळ्यांची मरही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे काडीची तपासणी करूनच छाटणीची योग्य जागा निवडल्यास उत्पादनासाठी फायदेशीर राहते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com