Agriculture Irrigation : पाणीचोरीच्या बंदोबस्तासाठी पाटबंधारेचे पोलिसांना साकडे

Water Theft : वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त नलिकेतून पाणी पुढे वाळवा तालुक्यात जात आहे. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेड येथे विना परवाना व्हॉल्व्ह सुरू केल्याचे आढळले.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त नलिकेतून पाणी पुढे वाळवा तालुक्यात जात आहे. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेड येथे विना परवाना व्हॉल्व्ह सुरू केल्याचे आढळले. त्यामुळे पाणी पुढे सरकण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

आठवडाभर असे प्रकार घडू लागल्याने अखेर नाइलाजास्तव पाटबंधारे विभागाने पाणी चोरीच्या बंदोबस्तासाठी सहकार्य करावे, अशी मागणी अर्जाद्वारे पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्याकडे केली आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : ‘ताकारी’चे पंप बंद केल्याने कालव्यांचा प्रवाह संथ

वाकुर्डे बुद्रुक योजना सुरू करून शिराळा व वाळवा तालुक्यात रेठरे धरण ओझर्डे, सुरूल, मरळनाथपूर, शिवपुरी, कार्वे, कापरी, ढगेवाडी परिसरात पाणी सोडून नंतर शिराळा तालुक्यात सोडण्याचे नियोजन आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : सांगलीतील सुरू योजनांचे आवर्तन बंद करण्याची वेळ

करमजाई तलावातून पाणी मानकरवाडी कालव्यातून मानकरवाडी ते रेड या १२ किलोमीटर पाइपलाइनमध्ये सोडले. मात्र निगडी, रेड -बेलदारवाडी, खेड धनगरवाडा परिसरात व्हॉल्व्ह सुरू करून पाणी घेतल्याचे प्रकार घडले आहेत. शिवपुरी, सुरूल, कापरी, कार्वे, ढगेवाडी येथे पाणी जाण्यास विलंब होत आहे.

पाणी चोरी अन् वादावादी

पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. वाकुर्डे योजनेचे पाणी बंदिस्त नलिकेद्वावारे सुरू केले. शेतीला पाणी मिळावे म्हणून व्हॉल्व्ह ठेवले आहेत. काही शेतकरी एकत्र येऊन सुरुवारीला रात्री, आता दिवसा चोरून व्हॉल्व्ह सोडून पाणी शेतात वा साठवण तलावात सोडू लागले आहेत. हे प्रणाम वाढल्याने पाणी पुढे जात नसल्याने पाणी न मिळालेले शेतकरी व घेणारे शेतकरी यांच्यात वाद झडू लागले आहेत.

वारंवार सांगूनही दोन दिवसांनंतर पुन्हा रेड येथे दिवसा विनापरवाना व्हॉल्व्ह सुरू करून पाणी घेण्याचा प्रकार झाला. मनुष्यबळ कमी असल्याने गस्तीला मर्यादा आहेत. त्यामुळे पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे.
- प्रकाश बंडगर, उपअभियंता, वारणावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com