International Diplomacy: इराणकडून चर्चेची तयारी दर्शविणारे संकेत मिळत असून, इराणी सत्ताकेंद्रात अंतर्गत मतभेद वाढत आहेत, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी केला आहे. मात्र, कोणताही करार वास्तववादी, विश्वासार्ह आणि त्याचे पालन करणारा असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रुबिओ म्हणाले, की इराणकडून वाटाघाटींचे संकेत मिळत आहेत. तेथील सत्तापदी असणाऱ्या व्यवस्थेमध्ये मतभेद वाढताना दिसत आहेत..Iran US Conflict: अमेरिकेकडून इराणचे महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त.त्याचबरोबर अमेरिकेकडून होर्मुझ सामुद्रधुनीत होणारी लष्करी कारवाईही त्यांनी न्याय्य ठरवली. या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या इराणच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य करून कारवाई केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. रुबिओ यांनी इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर जगावर दबाव आणण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला. जागतिक सागरी व्यापाराच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ अमेरिकेची नसून इतर देशांनीही लष्करी साधने किंवा आर्थिक मदतीच्या माध्यमातून यात योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली..फिलिपाइन्समध्ये होणाऱ्या ‘आसीयान’ संघटनेच्या सभासद देशांच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की अमेरिका जागतिक जहाजवाहतुकीचे संरक्षण सुरूच ठेवेल. मात्र, मित्रदेशांनीही या जबाबदारीत सहभाग घ्यायला हवा. युद्ध परिस्थितीवर राजनैतिक तोडगा काढण्याबाबत विचारले असता रुबिओ म्हणाले, की अमेरिका नेहमीच चर्चेसाठी खुली आहे. परंतु, इराणने कराराच्या अटींचे प्रामाणिकपणे पालन करण्याची तयारी दाखवली पाहिजे. अन्यथा अशा कराराला अर्थ उरत नाही..US-Iran Nuclear Talks: अमेरिका-इराण वाटाघाटींना धक्का.दरम्यान, अमेरिकेची इराणवरील हवाई मोहीम सलग नवव्या दिवशीही सुरू राहिली. इराणच्या सरकारी माध्यमांनी दक्षिण किनारपट्टीवरील अनेक शहरांमध्ये, तसेच तब्रीझ परिसरात स्फोट झाल्याचे वृत्त दिले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांमागे अमेरिका असल्याचे सांगत इराणसोबतच्या संघर्षात झालेल्या तीन अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे सांगितले. तसेच, इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखणे, हेच या कारवाईचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले..अमेरिकेचीही तयारीरुबिओ यांनी सांगितले की, लष्करी कारवाई आणि तोडग्यासाठी राजनैतिक प्रयत्न हे एकाच वेळी सुरू राहू शकतात. अमेरिका चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यास तयार आहे; मात्र कराराचे उल्लंघन करणारी भूमिका स्वीकारली जाणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.