Pune News : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी आयोटी तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट फार्मिंग उपकरणाने शेतीत क्रांती घडवली आहे. आतापर्यंत ६० सभासदांनी या योजनेत सहभाग घेतला असून, २३ शेतकऱ्यांच्या शेतावर हे उपकरण बसवण्यात आले आहे.भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आयोटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आधारित अत्याधुनिक स्मार्ट फार्मिंग उपकरण वरदान ठरत आहे..या उपकरणात १२ प्रकारच्या सेन्सरद्वारे सभासदांना पाणी व्यवस्थापन, हवामान अंदाज, रोग- कीटक नियंत्रण आणि मातीच्या गुणवत्तेची माहिती मिळते. यामुळे शेतीचे नियोजन अधिक कार्यक्षम आणि खर्चात बचत होत आहे.या उपकरणाद्वारे सभासद आपल्या मोबाईलवरून शेताची सद्यःस्थिती कोठूनही पाहू शकतात. जमिनीतील ओलावा, मातीचा प्रकार, हवामानानुसार पाण्याची गरज आणि झाडांची अवस्था यांचे नियोजन या यंत्राद्वारे शक्य होते. .AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्राने ऊस उत्पादनावाढ शक्य.तसेच, हवामान बदलानुसार रोग आणि कीटकांच्या हल्ल्याची पूर्वसूचना मिळते. त्यानुसार प्रतिबंधात्मक फवारणीचे संदेश मिळतात, ज्यामुळे खत आणि रासायनिक खर्च नियंत्रणात राहतो, अशी माहिती ऊस विकास अधिकारी विकास टेंगले यांनी दिली.या उपकरणाद्वारे सभासदांना शेतात किती पाऊस पडला, किती पाऊस अपेक्षित आहे, वाऱ्याची दिशा आणि वेग याची माहिती मिळते. .पुढील २४ तास आणि १५ दिवसांचा हवामान अंदाज उपलब्ध होतो. ज्यामुळे सभासद पुढील कामांचे नियोजन करू शकतात. तापमान सेन्सरद्वारे माती आणि वातावरणातील तापमान मोजले जाते, जे पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे. मातीच्या तापमान सेन्सरमुळे संभाव्य रोगांचा अंदाज घेता येतो..AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा.पानांचे ओलावा मोजण्यासाठी वापरपानांवरील ओलावा मोजण्यासाठी सेन्सरचा वापर होतो, ज्यामुळे पाऊस, धुके किंवा सिंचनामुळे पिकांवर होणारा परिणाम समजतो. पर्जन्य सेन्सर पावसाची तीव्रता मोजते, तर क्रॉप बाष्पीभवन (ETC) सेन्सर पाण्याच्या नुकसानीचे प्रमाण दर्शवते. लक्स मीटरद्वारे पिकांना उपलब्ध प्रकाशाचे प्रमाण मोजले जाते, जे पिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. सौर तीव्रतेचे निरीक्षण करून प्रकाश संश्लेषण आणि कीटक प्रादुर्भावाची माहिती मिळते. वाऱ्याचा वेग सेन्सरद्वारे फवारणीचे नियोजन करून रासायनिक प्रवाह कमी होतो..आर्थिक सहभाग रक्कम (रुपये)सहभागी सभासद .... ९०००कारखाना............६,७५०व्हीएसआय पुणे...... ९,२५०एकूण...........२५,०००.या अटी पूर्ण कराव्या लागतीलसभासदांनी ९००० रुपये कारखान्याच्या लेखा परिक्षण विभागाकडे जमा करावेत आणि पावती ऊस विकास विभागाकडे नोंदवावी. ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर बंधनकारक आहे. रोपांची लागवड केल्यास ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल..अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ऊस शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन वाढ कशी होईल, यासाठी कारखान्याच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सभासद देखील हे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपली शेती स्मार्ट बनवत आहेत. आगामी काळामध्ये जास्तीत जास्त सभासदांना यामध्ये सहभागी करून घेऊन हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा कारखान्याच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे.- पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.