शेतीमध्ये गुंतवणूक वाढवली पाहिजे

‘पोकरा’सारख्या योजना गावांना सकरण्यात मोठी भूमिका बजावू शकतात असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

जालना - युवक शेतकऱ्यांनी उत्पादक कंपन्या काढाव्यात आणि शेतीला पुरक विक्री व प्रक्रिया व्यवसायात उतरले पाहिजे. बदलत्या हवामानास (Climate Change) तोंड देण्यासाठी शेतीमध्ये गुंतवणूक (Investment In Agriculture) वाढवली पाहिजे. ‘पोकरा’सारख्या योजना (POCRA Scheme) गावांना सकरण्यात मोठी भूमिका बजावू शकतात असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील शेवगा येथील विघ्नेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या (Farmer Producer Company) वेअर हाउसच्या उद्‍घाटन प्रसंगी शनिवारी (ता. ६) पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. या वेळी श्री. पवार यांनी पोखरा योजनेअंतर्गत इतर ठिकाणच्या कामाची ही पाहणी केली.

श्री. पवार म्हणाले, ‘‘मराठवाड्यातील तरुणांनी एकत्र येऊन शेतकरी कंपनी काढली हा मोठा बदल आहे. उत्तम शेती करून मालाची विक्रीव्यवस्था केली तर येथील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी ग्रामीण भागात वाहनांची वाणवा असायची, पण आता लग्नात लोकांची बसायची व्यवस्था कुठे करायची यापेक्षा वाहनांची पार्किंग व्यवस्था महत्त्वाची झाली आहे. राहणीमान सुधारण्यासाठी उत्तम शेती करून विक्री व्यवस्था करणे शेतीमालाची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. शेवटी जीवनमान सुधारले पाहिजे. याच रस्त्याने कुठेही थांबायचे नाही आणखी पुढे जा व यशस्वी व्हा. हा ग्रामीण भागातील बदल आहे. जो राज्यातील काही भागांत अधिक आहे. ही तर सुरुवात आहे. मला खात्री आहे की तरुण मुलांनी अधिक लक्ष केंद्रित करून उत्तम शेती केली, तसेच मार्केटिंग, विक्री व्यवस्था या दृष्टिकोनातून विचार केला तर या वाहनांची संख्या अधिक वाढलेली बघायला मिळेल, असेही श्री पवार म्हणाले.

या वेळी आरोग्यमंत्री व पालकमंत्री राजेश टोपे, कृषी सचिव एकनाथ डवले, पोकरा प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी एस रणदिवे, पोकराचे कृषिविद्यावेत्ता विजय कोळेकर, आत्माच्या प्रकल्प संचालक शितल माकर आदींची प्रमुख्याने उपस्थिती होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com