Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Co-operative Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील मागील संचालक मंडळात संचालकांची सहकार अधिनियम कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे.
Sangli District Bank
Sangli District BankAgrowon

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील मागील संचालक मंडळात संचालकांची सहकार अधिनियम कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. यासाठी चौकशी अधिकारी डॉ. प्रिया दळणकर यांनी बॅँकेकडून कलम ८३ अंर्तगत झालेल्या चौकशीचा अहवाल मागवला आहे. दोन ते तीन दिवसांत बॅँकेला ८८ अंतर्गत कलम ७२ (१) ची नोटीस बजावण्यात येणार असून, याद्वारे संबंधित संचालक, अधिकाऱ्यांची माहिती व अन्य कगदपत्रे सादर करण्यास सांगण्यात येणार आहेत.

सांगली जिल्हा बॅँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या गैरकारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. यानंतर तक्रारीतील मुद्यांच्या अनुषंगाने बॅँकेचे सुरुवातीला विशेष लेखा परीक्षक छत्रीकर यांच्या समितीने चाचणी लेखापरीक्षण केले.

Sangli District Bank
Sangli DCC Bank : शेतकरी ‘ओटीएस’ योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ शक्य

यात काही तक्रारीत तथ्य आढळल्याने सहकार अधिनियम कलम ८३ अंतर्गत चौकशीची शिफारस छत्रीकर समितीने केली. त्याअंतर्गत नाशिकचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी चौकशी केली.

चौकशीतही काही आरोपात तथ्य आढळले. बॅँकेचे सुमारे ५० कोटी ५८ लाखांचे नुकसान झाले. या नुकसानीची जबादारी निश्‍चित करून त्याची वसुली करण्यासाठी सहकार अधिनियमातील कलम ८८ अंतर्गत चौकशीची शिफारस जाधव यांनी केली होती. चौकशीसाठी कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांची नियुक्ती केली आहे.

दळणकर यांनी आता ही चौकशी सुरू केली आहे. त्यांनी बॅँकेकडून अहवाल मागविला आहे. त्यानुसार माजी संचालक, अधिकाऱ्यांची नावे, पत्ते तसेच अन्य माहिती व चौकशीच्या अनुषंगाने आवश्यक कादगपत्रे सादर करण्याबाबत जिल्हा बॅँकेला येत्या दोन-तीन दिवसांत नोटीस दिली जाणार आहे. यानंतर संबंधित संचालक, अधिकारी यांनाही नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले जाईल.

Sangli District Bank
Sangli DCC bank : जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा कवच

या प्रकरणात बॅँकेचे नुकसान

जिल्हा बॅँकेच्या कलम ८३ च्या चौकशीत मागील संचालकांच्या काळात बॅँकेचे ५० कोटी ५८ लाख ८७ हजार ८८० रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला आहे. यात महांकाली व माणगंगा कारखाना सेल्स सर्टिफिकेट नोंदणीसाठी विलंब झाल्याने मुद्रांक खात्याने केलेला दंड, विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी स्वनिधीतून केलेला अनाठायी खर्च, नॉन बॅँकिंग ॲसेट खरेदी करताना केलेला चुकीचा जमाखर्च, महांकाली साखर कारखान्याकडील खराब साखर व दरातील फरक यामुळे जिल्हा बॅँकेस झालेले नुकसान याचा समावेश आहे.

‘सांगली जिल्हा बॅँकेची कलम ८८ अंतर्गत चौकशीसाठी विभागीय सहनिबंधकांनी माझी नियुक्ती केली आहे. चौकशीचे कामकाज सुरू केले असून, बॅँकेकडून अहवाल मागविला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत बॅँकेला ७२ (१) नुसार नोटीस बजावून आवश्यक माहिती, कागदपत्रे मागविली जातील. त्यानंतर संबंधितांना नोटिस पाठविली जाईल.
- डॉ. प्रिया दळणकर, चौकशी अधिकारी, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com