Government Subsidy : व्याज सवलत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Nagar Bank News : शासनाकडून जिल्हा सहकारी बँकेकडे शेतकऱ्यांची प्राप्त झालेली व्याज सवलत रक्कम व इतर अनुदान संबंधितांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
Nagar Bank News
Nagar Bank NewsAgrowon
Published on
Updated on

Nagar District Bank News : ‘‘शासनाकडून जिल्हा सहकारी बँकेकडे शेतकऱ्यांची प्राप्त झालेली व्याज सवलत रक्कम व इतर अनुदान संबंधितांच्या बँक खात्यात जमा केले आहे. कुठल्याही योजनेचे अनुदान बँकेकडे प्रलंबित नाहीत,’’ अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.

जिल्हा बॅंकेने म्हटले आहे की, बँक दरवर्षी सभासदांना मोठ्या प्रमाणात अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा व पशुपालन खेळते भांडवल कर्जपुरवठा करत आहे.

या शेतकरी सभासदांनी तीन लाखांपर्यंत अल्पमुदत कर्जाची नियमित परतफेड केल्यास केंद्र शासन तीन टक्के व राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन टक्के याप्रमाणे सहा टक्के व्याज सवलत मिळत आहे.

Nagar Bank News
Food Processing Industries Scheme : नगर जिल्ह्यात अडीचशे शेतकऱ्यांच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला मंजुरी

यापूर्वी शासनाकडून व्याज सवलत बँकेकडे जमा होत होती. त्यावेळी बँक ती रक्कम संबंधित सेवा संस्थांच्या चालू खाती वर्ग करत होती. शेतकऱ्यांकडून व्याज वसूल केले जात नव्हते. २०१९-२० पासून सवलत रक्कम सभासदांच्या बचत खाती जमा करण्याच्या सूचना सहकार खात्याने दिल्या.

त्यामुळे सभासदांकडून अल्पमुदत कर्जाची रक्कम वसूल करताना व्याज वसूल करून घेतले जाते. ही व्याज सवलत रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते, असे कर्डिले म्हणाले.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचे ५६.०९ कोटी प्रलंबित

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत२०१९-२० पर्यंतचे व्याज सवलत योजनेअंतर्गत सर्व प्रस्ताव मंजूर आहेत. व्याज सवलतीची रक्कम शासनाकडून सभासदांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.

तसेच २०२०-२१ मधील जिल्ह्यातील दोन लाख ७ हजार ६५० कर्जदार शेतकरी सभासदांचे २९.३० कोटी, २०२१-२२ मधील दोन लाख ५३ हजार ७८२, कर्जदार शेतकरी सभासदांचे ५६.०९ कोटी रुपये व्याज सवलत रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com