Sugarcane Pest : लोकरी मावा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

Woolly aphids Pest : लोकरी मावा ही कीड ऊस, ज्वारी आणि बाजरी पिकावर आपली उपजीविका पूर्ण करते. उसावरील लोकरी मावा किडीचे शास्त्रीय नाव सेराटोव्हॅकुना लॅनिजेरा असे आहे.
Woolly aphids Pest
Woolly aphids PestAgrowon
Published on
Updated on

अमोल ढोरमोरे :

लोकरी मावा ही कीड ऊस, ज्वारी आणि बाजरी पिकावर आपली उपजीविका पूर्ण करते. उसावरील लोकरी मावा किडीचे शास्त्रीय नाव सेराटोव्हॅकुना लॅनिजेरा असे आहे. ही कीड ऊस, ज्वारी आणि बाजरी या पिकांवर आपली उपजीविका पूर्ण करते. साधारण पावसाळा संपत आल्यानंतर (म्हणजेच ऑक्टोबर) ते उन्हाळ्यात किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. ही रस शोषण करणारी कीड आहे. किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात साधारण २० टक्के, तर साखर उताऱ्यात अडीच ते ३ टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असते.

जीवनक्रम

किडीच्या पिले आणि प्रौढ अशा दोन अवस्था आहेत. पिले अवस्था आणि प्रौढ अवस्था सर्वांत जास्त नुकसानकारक असते. एक मादी साधारण १५ ते ३५ किंवा त्यापेक्षा जास्त पिल्लांना जन्म देऊ शकते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रसार

किडीचा प्रसार वाऱ्यामार्फत बाधित शेतातून तसेच ऊस वाहतुकीद्वारे होतो. किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यानंतर लगेच सुरू होतो. उन्हाळ्यात, जास्त सापेक्ष आर्द्रता आणि दीर्घकाळ कोरड्या वातावरणात ही कीड जास्त कार्यक्षम असते.

Woolly aphids Pest
Sugarcane Production : साखरेऐवजी उपपदार्थनिर्मिती ठरेल फायदेशीर

नुकसानीचा प्रकार

ही कीड खोडवा पिकावर जास्त दिसते. बिगर हंगामात ज्वारी, बाजरी या यजमान पिकांवर उपजीविका करते.

अनुकूल हवामान स्थिती तयार होताचा किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

पानाच्या खालील बाजूस राहून रस शोषण करते.

पानांवर पिवळे ठिपके पडून ती वाळतात.

कीड शरीरावाटे मधासारखा गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

कीडग्रस्त शेतातील बेणे लागवडीसाठी वापरू नये.

प्रादुर्भावग्रस्त पाने व वाळलेले पाचट काढून जाळून टाकावे.

बाधित उस व बाधित ऊसातील वस्तू, ट्रॅक्टर वगैरे यांची वाहतूक प्रादुर्भाव नसलेल्या शेतात करणे टाळावे.

प्रादुर्भावग्रस्त उस जनावरांना खाऊ घालू नये.

खोडवा घेणे टाळावे.

जास्त प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.

Woolly aphids Pest
Namo Sanman Nidhi : ‘नमो महासन्मान’चा निधी आज लाभार्थ्यांच्या खात्यात

मेटाऱ्हायझीम ॲनिसोप्ली किंवा व्हर्टीसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम याप्रमाणे या बुरशीजन्य कीटकनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (ऊस संशोधन केंद्र, कोइमतूर यांच्या शिफारशीनुसार) डीफा ॲफिडिव्होरा १००० अळ्या किंवा मायक्रोमस इगोरोटस २५०० अळ्या किंवा क्रायसोपर्ला कार्निया या मित्र कीटकांची २५०० अंडी प्रति हेक्टरी सोडावीत. मित्र कीटक शेतात सोडल्यानंतर साधारण ३ ते ४ आठवडे कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये.

रासायनिक फवारणी : (प्रमाण प्रति लिटर पाणी)

किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर डायमिथोएट (३० टक्के ईसी) १.५ मिलि प्रति लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारणी घ्यावी. ही शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या कृषी दर्शनीनुसार करण्यात आली आहे. लेबल क्लेम व अधिक मार्गदर्शनासाठी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com