Nanded News: अतिवृष्टी, ढगफुटीमुळे खरीप हंगाम संपूर्णतः नुकसान झाल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्राप्रमाणे अमलात न आणता निर्णय प्रक्रियेने शोषण करणारी पीक विमा महाराष्ट्रात लागू केली, त्यामुळे अनेक शेतकरी असंतोष होऊन सहभागी झाले नाहीत, अशा शेतकऱ्यांनाही पीक विमा नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन राज्याच्या मुख्य सचिवांकडे मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे यांनी केली आहे..प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २०१५ मध्ये नवीन प्रधानमंत्री पीकविमा योजना ही महाराष्ट्रामध्ये २०२४ पर्यंत चालू होती, परंतु २०२५ मध्ये त्यामध्ये काही बदल करण्यात आले जे बदल महाराष्ट्राच्या निर्णयप्रक्रियेने केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण झाले आणि त्याचा जास्त फायदा विमा कंपन्याला होणार होता..Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन.त्यामुळे काही जागृत शेतकऱ्यांनी निषेध म्हणून या प्रधानमंत्री पीकविमा २०२५ खरीपमध्ये सहभागी झाले नाहीत. यापूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये पेरणीपूर्व जोखीम, नैसर्गिक आपत्ती जोखीम, स्थानिक आपत्ती जोखीम व कापणी पश्चात जोखीम अशा सर्व जोखीम त्यांनी रद्द केल्या. त्यामुळे निर्णयप्रक्रियेच्या नाराजीतून महाराष्ट्रातल्या तसेच नांदेड जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला नाही..Crop Insurance Compensation: गतवर्षीची पीकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग .२०२५ खरिपामध्ये ढगफुटीमुळे संपूर्ण नांदेडमध्ये खरीप हंगामात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आहे. परंतु निर्णयप्रक्रियेच्या चुकीच्या निर्णयामुळे कंपनीचा फायदा आणि शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. नांदेड जिल्हा हा सहभागामध्ये देशामध्ये नंबर एकमध्ये होता, परंतु सन २०२५ खरीपमध्ये अर्ध्याही शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला नाही..या योजनेमध्ये सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देऊन जागतिकीकरणाच्या काळात शोषणग्रस्त नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. मोरे यांनी केली आहे. निवेदनावर माधवराव देसाई, लिंगोजीराव पाटील, त्र्यंबक पाटील, बळी पाटील, खुशाल पाटील, नागोराव पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.