Chhatrapati Sambhajinagar News: कृषी प्रदर्शनात यंदा यांत्रिकीकरण आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. आधुनिक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी विविध यंत्रसामग्री, स्मार्ट उपकरणे व तंत्रज्ञानाचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात आले आहे..जमिनीची मशागत आणि पालापाचोळा व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणारे रोटाव्हेटर आणि मल्चर फवारणी आणि तण नियंत्रणासाठी आधुनिक पर्याय असणारे ब्लोअर आणि व्हिडर यांची माहिती घेण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल राहिला. त्याशिवाय मशिनरी, इलेक्ट्रिक साधने, स्वयंचलित ठिबक व तुषार सिंचन यंत्रणा, तसेच डिजिटल शेतीच्या दृष्टीने मोबाइल अॅप्सची माहिती देणाऱ्या दालनांवर मोठी गर्दी दिसून आली..Agrowon Agri Exhibition: ‘अॅग्रोवन कृषी प्रदर्शना’चे दिमाखदार उद्घाटन.त्याशिवाय पिकांची कापणी आणि मळणी सुलभ करणाऱ्या हार्वेस्टरसारख्या आधुनिक यंत्रांकडेही शेतकऱ्यांची पावले वळत होती. वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवरील सौरकुंपणाकडे शेतकऱ्यांचे सर्वाधिक लक्ष वेधले होते..Agri Exhibition 2026: प्रदर्शनात दररोज पेरणी यंत्र जिंकण्याची संधी .केवळ पीक उत्पादन न घेता त्यावर प्रक्रिया करून उपपदार्थ तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून आला. त्यादृष्टीने प्रदर्शनात प्रक्रिया आणि गृह उद्योगासाठी उपयुक्त ठरणाऱ्या छोट्या-छोट्या मशिनरींची माहिती शेतकरी विशेषतः महिला शेतकरी घेत असल्याचे चित्र होते..ड्रोनमुळे अतिशय कमी वेळेत आणि समप्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांशी थेट संपर्क टळतो. त्यामुळे या दालनावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.