Agriculture Cultivation Workshop : शेती शाळेतून पीक लागवड ते कापणीची माहिती

पीक पाहणी करून पिकाचे लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापनापासून ते पीक काढणीपर्यंतची इंत्यभूत माहिती खरीप आणि रब्बी हंगामात २५५ शेतीशाळांच्या माध्यमातून देण्यात आली.
Cultivation
CultivationAgrowon
Published on
Updated on

Washim News : वाशीम जिल्हयात या वर्षात कृषी विभागाने शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला छेद देऊन आधुनिक पद्धतीने कृषी तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घ्यावे यासाठी शेतीशाळा राबवल्या.

पीक पाहणी करून पिकाचे लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापनापासून ते पीक काढणीपर्यंतची इंत्यभूत माहिती खरीप आणि रब्बी हंगामात २५५ शेतीशाळांच्या माध्यमातून देण्यात आली. शेती शाळेमध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कृषी सहायकांनी सुमारे साडे सात हजारांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हयात खरीप हंगामात १७४ शेतीशाळा घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असता १५९९ शेतीशाळा घेण्यात आल्या. यामध्ये चार हजार ७७० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

या शेतीशाळेतून शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन बीज प्रक्रिया याबाबतची माहिती देऊन घेण्यात येणाऱ्या पिकांच्या वेळेनुसार तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

Cultivation
Kharif Paisewari : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत पैसेवारी कमी

खरीप हंगामातील शेती शाळेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन पिकांच्या १३, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तूर पिकाच्या १५, राज्य पुरस्कृत मूल्य साखळी योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाच्या २०, कापूस पिकाच्या आठ, पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प

अर्थात क्रॉपसॅपअंतर्गत तूर पिकाच्या तीन, पोकरा योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस पिकांच्या ६८, आत्माअंतर्गत सोयाबीन, तूर, रेशीम, हळद, जिरानियम, सेंद्रिय तूर, भाजीपाला, संत्रा, कापूस, कृषी प्रक्रिया आणि सेंद्रिय निविष्ठा अंतर्गत ३२ शेतीशाळा घेण्यात आल्या.

रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत १४, आत्मा अंतर्गत १०, पोकरा अंतर्गत ३१, क्रॉपसॅपच्या १२ अशा एकूण ६७ शेतीशाळा राबवण्यात आल्या. रब्बी ज्वारीच्या दोन आणि आत्माअंतर्गत इतर पिकांच्या ११ शेतीशाळाही झाल्या.

शेतीविषयक पिकांची लागवड, कीड व्यवस्थापन, आंतर मशागत, बीज प्रक्रियांची माहिती शेतकरी महिलांना व्हावी तसेच कृषी क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने पुढे याव्यात यासाठी यावर्षीच्या रब्बी हंगामात महिलांसाठी १६ शेती शाळा घेण्यात आल्या.

यातील एक शेती शाळा राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, सात शेतीशाळा आत्मा, पाच शेतीशाळा पोकरा आणि तीन शेती शाळा क्रॉपसॅप अंतर्गत घेण्यात आल्या.

Cultivation
Kharif Paisewari : नांदेड जिल्ह्याची खरिपाची अंतिम पैसेवारी ४६ पैसे जाहीर

खरीप हंगामातील तालुकानिहाय शेतीशाळा

वाशीम तालुका - १४

रिसोड तालुका - २४

मालेगाव तालुका - १५

मंगरूळपीर तालुका- १७

मानोरा तालुका - ६१

कारंजा तालुका - २५

एकूण - १५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com