Pakistan
PakistanAgrowon

Pakistan : पाकिस्तानात महागाईचा भडका

जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा फटका महागाईचा दर पोचला ३८.४२ टक्क्यांवर

Pakistan Mahagai News : पाकिस्तानातील आर्थिक संकट गहिरे होऊ लागले असून जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ सुरूच असल्याने येथील महागाईने आज ३८.४२ टक्क्यांचा नवा उच्चांक गाठला.

सरकारने )Government) उत्पन्न वाढविण्यासाठी नव्याने काही कर लादले असून पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला सात अब्ज डॉलरची मदत करण्याची तयारी दर्शविली असून पहिल्या टप्प्यात त्यातील १.१ अब्ज डॉलरची मदत मिळविण्यासाठी काही आर्थिक कसोट्या पाकला पूर्ण कराव्या लागतील.

वाढत्या महागाईवरून पाकिस्तानातील माध्यमांनी तेथील सरकारला धारेवर धरले आहे. ‘दि एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वर्तमानपत्राने पाकिस्तानी सांख्यिकी आयोगाच्या हवाल्याने महागाईबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

Pakistan
Cotton Rate : चीन, पाकिस्तान, अमेरिकेत कापसाचे भाव कसे आहेत?

सरत्या आठवड्यामध्ये ३४ जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या असून पाच वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. बारा वस्तूंच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. या वाढत्या महागाईचा मोठा फटका मध्यमवर्गीयांना देखील सहन करावा लागत आहे.

आठवड्यांचा निकष लावला तर या महागाईच्या दरामध्ये २.८९ टक्क्यांची वाढ झाली असून त्याआधीच्या आठवड्यात तो दर ०.१७ टक्क्यांनी वाढला होता. मागील आठवड्यामध्ये हाच महागाईचा दर ३४.८३ टक्के एवढा नोंदला गेला होता.

बऱ्याचशा वस्तू महागल्या

पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढत असल्याने महागाई आणखी तीव्र झाली असल्याचे सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये ५१ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरून महागाईचा एकूण दर निश्चित करण्यात येतो.

यासाठी देशातील १७ बड्या शहरांमधील बाजारपेठांचा विचार करण्यात येतो. पेट्रोलच्या दरामध्ये ८.८२ टक्के, खाद्यतेलाच्या दरामध्ये ८.६५ टक्के, तुपाच्या दरामध्ये ८.०२ टक्के, चिकनच्या दरात ७.४९ टक्के तर डिझेलच्या दरामध्ये ६.४९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com