India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारात मका, गहू, तांदूळ, दूध उत्पादकांना दिलासा; वाणिज्यमंत्र्यांनी दिली माहिती
Trade Deal : बहुचर्चित भारत आणि अमेरिका व्यापार कराराचे संयुक्त निवेदन दोन्ही देशांकडून जाहीर करण्यात आले. यामध्ये अमेरिकेतील वाळलेले पशुखाद्य, पशुखाद्यासाठी लाल ज्वारी, सोयाबीन तेल, सुकामेवा, ताजे फळ आणि भाज्या, वाईन आणि मद्य आयातीस भारताने संमती दिली आहे.