Russia Ukraine War : रशिया-युक्रेन संघर्षात भारताची भूमिका महत्वाची : प्राइस

युक्रेनमधील विनाशाला रशिया जबाबदार आहे. त्यासाठी अमेरिका भारत आणि इतर मित्र देशांच्या सातत्याने संपर्कात आहेत. जागतिक पातळीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमेरिका आणि भारत दोन्ही राष्ट्रे कटिबद्ध आहेत.
Ned Price
Ned PriceAgrowon
Published on
Updated on

रशिया-युक्रेनमधील संघर्षाबाबत (Russia Ukraine War) भारतासोबत अनेक देशांशी आम्ही संपर्क केला आहे. या दोन देशात शांती निर्माण करण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे व्यक्तव्य अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस (Ned Price) यांनी केलं आहे.

ते वॉशिंगटनमधील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांततेच्या मताशी सहमत असल्याचेही यावेळी सांगितले. तसेच आजचा काळ हा युद्धाचा नाही नाही, असेही प्रतिपादन केले.

प्राइस यांनी यावेळी रशियाच्या आक्रमक भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. "युक्रेनमधील विनाशाला रशिया जबाबदार आहे. त्यासाठी अमेरिका भारत आणि इतर मित्र देशांच्या सातत्याने संपर्कात आहेत. जागतिक पातळीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमेरिका आणि भारत दोन्ही राष्ट्रे कटिबद्ध आहेत. भारताने युक्रेनला दिलेल्या पाठींब्याचे अमेरिका स्वागत करते, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Ned Price
Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीनचा बाजार आज कसा राहिला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० च्या व्यासपीठावरून आजचा काळ युद्धाचा नाही, असे मत व्यक्त केले होते. मोदी यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे यावेळी प्राइस म्हणाले. रशिया-युक्रेनच्या संघर्षामुळे जागतिक अन्न सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

दरम्यान, मागील एक वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा जगभरातील शेतीक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे जगभरात उडालेल्या महागाईच्या भडक्यात तेल ओतलं गेलं. त्याचे परिणाम अवघ्या जगाला भोगावे लागत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर या संघर्षाबद्दल मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com