Inspiring Conservation Story: एका माणसाच्या ध्यासातून उभारले अभयारण्य
Man-Made Sanctuary Story: ‘‘तुम्ही पत्रकारच काय, पण मंत्री असला तरी पास असल्याशिवाय मी तुम्हाला आत सोडणार नाही,” या ताडोबा अभयारण्याच्या साध्या गेटमनच्या निर्वाणीच्या वाक्याने धोंडीराम महादेव मोहिते यांना जागे केले. आपल्या बोडक्या डोंगरावरही असाच एखादा गेटमन असता तर... आज तिथे घनदाट जंगल उभे राहिले असते.