Pune News: भूतकाळाचा सखोल वेध घेत महत्त्वपूर्ण निष्कर्ष आणि अंमलबजावणीयोग्य शिफारशी भारतीय क्वार्टनरी काँग्रेसमधून पुढे येतील. तसेच भारतीय शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन देशाच्या गरजांनुसार क्वार्टनरी (२.५ दशलक्ष वर्षपूर्व ते आजपर्यंतचा कालखंड) पृथ्वी विज्ञानातील मोठे, सामूहिक संशोधन प्रकल्प हाती घेण्याचे आवाहन पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी केले..पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये २१ ते २३ जानेवारी दरम्यान तिसऱ्या ‘भारतीय क्वार्टनरी काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्वार्टनरी काळाच्या माध्यमातून पृथ्वीची गतिशीलता आणि मानव-पर्यावरण परस्पर संवादाचा मागोवा’ हा या आंतरराष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बुधवार डॉ. रविचंद्रन बोलत होते..District Science Exhibition: गणोरीत ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप .या वेळी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव, राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अभ्यास केंद्राचे प्रा. एन. व्ही. छलपथी राव, आगरकर इन्स्टिट्यूटचे डॉ. प्रशांत ढाकेफळकर, शास्त्रज्ञ सुवर्णा फडणवीस, डॉ. एस. के. टंडन, ‘एओक्यूआर’च्या सचिव डॉ. बिनीता फर्टियाल, सुकांत रॉय, ज्योती रे उपस्थित होते..श्री. रविचंद्रन म्हणाले, ‘‘या आंतरराष्ट्रीय परिषदेचा निवडलेला विषय अत्यंत महत्त्वाचा असून, विविध निदर्शकांच्या आधारे पृथ्वीचा भूतकाळ उलगडण्यास तो मदत करतो. पृथ्वी विज्ञान मंत्रालय सर्व घटकांचा समग्र विचार करून कार्य करीत आहे. विशेषतः ध्रुवीय संशोधनावर भर दिला जात आहे. अंटार्क्टिकामधील गाळनमुने, सरोवरे, हिमनमुने व बर्फाच्या थरांमधून मिळणाऱ्या विविध निदर्शकांचा वापर करून भूतकाळाचे पुनर्रचन कार्य केले जात आहे..Agricultural Science Centre: विविध विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करा.यासाठी लवणस्तंभ (स्पेलिओथर्म्स), महासागर व सरोवरातील गाळ, वृक्षवलये आणि हिमनमुने यामध्ये परस्पर तुलना व मानकीकरण (इंटर-कॅलिब्रेशन) आवश्यक आहे. क्वार्टनरी पॅलिओक्लायमेट (पृथ्वीच्या इतिहासातील हवामानाचा अभ्यास) संशोधनातून हिमयुग, आंतर-हिमयुग कालखंड, शेवटचा हिमयुगीन कमाल टप्पा तसेच हरितगृह वायूंची भूमिका आणि त्यांचे परिणाम यासारखे महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहे.हे संशोधन अत्यंत बहुविषयक असून, हवामान, हिमनदी, समुद्रपातळीतील बदल, महासागर परिसंचरण, भूशास्त्र, भूआकृतिशास्त्र, ज्वालामुखी, विवर्तनिकी तसेच मानव उत्क्रांती आणि पुरातत्त्व अभ्यास यांचा त्यात समावेश आहे..अभ्यासातून शाश्वत विकासाची दिशा मिळेलभारतीय संदर्भात ‘क्वार्टनरी’ विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी मॉन्सूनची उत्क्रांती, हिमालयीन हिमनद्या, नदी प्रणाली, भारतीय किनाऱ्यावरील समुद्र पातळीतील बदल, सिंधू–गंगा-ब्रह्मपुत्रा खोऱ्यांचा इतिहास तसेच दक्षिण आशियातील मानवी वसाहतींचा विकास समजून घेण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरत आहे. भूतकाळ समजून घेतल्यास वर्तमान आणि भविष्यकालीन धोके, धोरणे व शाश्वत विकासासाठी दिशा मिळू शकते, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी या वेळी दिली..भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव म्हणाले, की सध्या संस्थेतील सुमारे दहा शास्त्रज्ञ ‘पॅलिओक्लायमेट’ संशोधनावर काम करत आहे. यातून हवामान बदल संशोधन केंद्राच्या माध्यमातून भविष्यातील हवामान बदलांचा अभ्यास, मॉडेलिंग आणि अंदाज बांधणीवर भर दिला जात आहे. परिषदेत वरिष्ठ शास्त्रज्ञ नवीन गांधी यांनी प्रास्ताविक केले. तर सुवर्णा फडणवीस यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.