Pune News: ‘‘गाव, मजूर आणि शेतकरी वर्गाची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल,’’ असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. जागतिक जैवइंधन दिनानिमित्ताने प्राज उद्योग समूहाने सोमवारी (ता.११) पुण्यात आयोजिलेल्या ‘प्राज बायोव्हर्स’ उपक्रम सोहळ्यात ते बोलत होते. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, हिरो मोटोकॉर्पच्या ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक विक्रम कसबेकर, प्राजच्या बायो-एनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी व्यासपीठावर होते. डॉ. चौधरी लिखित ‘होरायझन बियॉन्ड ड्रिम्स ..अॅज इज व्हाट इज’ पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले..श्री. गडकरी म्हणाले, ‘‘गावे आणि शेतकरी वर्गाचा विकास होत नसून स्थिती खालावते आहे. देशाच्या ‘जीडीपी’त (सकल राष्ट्रीय उत्पन्न) सेवा क्षेत्राचा ५४ टक्के, उद्योगाचा २४ टक्के तर कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १४ टक्के आहे. त्यामुळे भारताला जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता करायचे असल्यास ग्रामीण व कृषी व्यवस्थेला बळकट करावे लागेल. कृषी क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा किमान २४ टक्क्यांपर्यंत न्यावा लागेल. त्यासाठी जैवइंधन निर्मिती उद्योग मोठी कामगिरी बजावू शकतो.’’.Nitin Gadkari : सिंचन, कापूस दराअभावी शेतकरी आत्महत्या.‘अतिरिक्त उत्पादनामुळे भाव मिळत नाहीत’जैवइंधन उद्योगाचे महत्त्व स्पष्ट करताना मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘देशात तांदूळ, गहू भरमसाट पिकवला जातो आहे. हे अतिरिक्त धान्य ठेवायलाही जागा नाही. शेतकऱ्यांनाही योग्य भाव मिळत नसल्याचे कारण जादा पिकणारे अन्नधान्य आहे. त्यामुळे धान्याधारित जैवइंधन निर्मितीकडे वळावे लागेल. देशात मक्याचे भाव व लागवड क्षेत्र वाढले आहे. कारण इथेनॉलमुळे मक्याला मागणी वाढली आहे. परिणामी, केवळ तांदूळ, गहू पिकवून देशाची प्रगती होणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर जैवइंधन निर्मितीवर भर द्यावा लागेल. तसे केल्यास स्मार्ट सिटीऐवजी देशात स्मार्ट व्हिलेज उभे राहू शकतील.’’.जैवइंधन धोरणाचे थेट लाभ शेतकऱ्यांनाडॉ. चौधरी म्हणाले, की कृषी क्षेत्रात शाश्वत व्यवस्था आणि ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता जैवइंधनात आहे. या धोरणाचा पायाच नितीन गडकरी यांनी घातला आहे. यामुळे जगाच्या नकाशावर भारत नेत्रदीपक कामगिरी करतो आहे. या धोरणाचे लाभ थेट शेतकऱ्यांना मिळत आहेत. इथेनॉलचा दुसरा टप्पा आता पेट्रोलमधील मिश्रणाचा राहील. सीबीजी, बायोबिटूमन, हवाई जैवइंधन, बायोहायड्रोजन, मरिन बायोफ्युएल या जैवइंधनाचा झपाट्याने प्रसार होईल. ‘प्राज बायोव्हर्स’तून जैवइंधन व्यवस्थेला देशविदेशात मोठी चालना मिळेल..Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’.या वेळी आयोजिलेल्या जैवइंधन प्रदर्शनात इथेनॉल चालणारे देशातील पहिले जनसेट इंजिन किर्लोस्कर कंपनीने सादर केले. तसेच, ‘हीरो’ तसेच ‘टोयोटा’ या नामांकित कंपन्यांनी जैवइंधन आधारित नवी वाहने मांडली. मंत्री गडकरी यांनी प्रदर्शनाला भेट देत नव्या उत्पादनांची माहिती उत्सुकतेने जाणून घेतली..‘शेती क्षेत्रातील कामाची दखल नाही’‘‘माझ्या भागात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे मी व्यथित झालो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी यापुढे जीवनात काम करण्याचा मी निर्धार केला. त्यानंतर शेती क्षेत्रात मी सातत्याने अनेक वर्षे काम केले; पण माध्यमे किंवा इतरांनी त्याची हवी तशी दखल घेतली नाही. अर्थात, त्याचे मला दुःख नाही. शेतकऱ्यांसाठी यापुढेही मी काम करीत राहील,’’ अशी व्यथा आणि निर्धार गडकरी यांनी बोलून दाखवला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.